अहमदनगर जिल्ह्यात राज्यातील दुसर्या क्रमांकाची रुग्णवाढ! संगमनेर तालुक्यात आज दिडशेहून अधिक रुग्ण; निम्मी रुग्णसंख्या पठारभागातून..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाच्या बाबतीत अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करु लागला असून आज राज्यातील सर्वाधीक प्रादुर्भाव होणार्या जिल्ह्याच्या पंक्तित अहमदनगर दुसर्यास्थानी पोहोचला आहे. आजच्या अहवालातून शेवगाव, संगमनेर, पारनेर, जामखेड व कर्जत तालुक्यातील रुग्णसंख्या पुन्हा फुगली असून केवळ पाथर्डी तालुक्यातील संक्रमणात दिलासादायक घट नोंदविली गेली आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागात सुरु झालेला कोविडचा उद्रेक अद्यापही शांत होण्याचे नाव घेत नसल्याचे धक्कादायक चित्रही आज समोर आले असून तालुक्यात आढळलेल्या 154 पैकी 78 रुग्ण एकट्या पठारभागातून समोर आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आजपासून साकूरसह पठारावरील वीस गावांमध्ये दहा दिवसांचा ‘लॉकडाऊन’ सुरु झाला आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 24 हजार 713 झाली आहे.
कोविड संक्रमणाच्या पहिल्या लाटेनंतर बिनधास्त झालेल्या शासन, प्रशासन व नागरिकांनी दुसर्या लाटेला निमंत्रण दिले आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जिल्ह्याने भोगले. एप्रिल आणि मे या दोनच महिन्यात जिल्ह्यातून दोन लाखांपेक्षा अधिक रुग्ण समोर येण्यासह पाच हजारांहून अधिक नागरिकांचे बळीही गेले. त्यातून नेमका बोध घेवून पुढील संक्रमण थोपवता येईल असे अपेक्षित असतांना जूनच्या सुरुवातीला दुसरी लाट ओसरत असतांना नागरिकांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आणि आटोक्यात आलेली संक्रमणाची दुसरी लाट पुन्हा एकदा उफाळून आली असून त्याचा सर्वाधीक फटका पारनेर, संगमनेर, कर्जत, शेवगाव, जामखेड, पाथर्डी नगर ग्रामीण व श्रीगोंदा तालुक्याला बसत आहे. संगमनेर तालुक्यातील पठारभागात संक्रमणाची गती अधिक असून या भागातील 43 गावांमधून दररोज तालुक्याच्या निम्मी रुग्णसंख्या समोर येवू लागली आहे.
आजही तालुक्यातील 55 गावांमधून 154 जणांना कोविडची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात पठारभागातील 26 गावे व वाड्यावस्त्यातील 78 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या अहवालात संगमनेरात उपचार घेत असलेल्या अन्य तालुक्यातील पाच रुग्णांचाही समावेश आहे. तर शहरातील अवघ्या पाच जणांना संक्रमण झाले आहे. शहरातील 73 वर्षीय महिलेसह 50 वर्षीय इसम, 30, 24 व 23 वर्षीय तरुण बाधित झाल्याचे समोर आले आहे. पठारभागातील संपन्न बाजारपेठ समजल्या जाणार्या साकूर परिसरातील कोविडचा उद्रेक अद्यापही आटोक्यात येत नसल्याचे चित्र दिसत आहे. आजही एकट्या साकूरमधून 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी पठारभागाच्या दौर्यावर आलेल्या जिल्हाधिकार्यांनी साकूर मधील लोकप्रतिनिधींना स्वयंस्फूर्तीने दहा दिवसांचा ‘लॉकडाऊन’ पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला आजपासून सुरुवात झाली असून साकूरसह 20 गावे आजपासून कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत.
आजच्या अहवालात पठारावरील साकूर येथील 66, 55, 37, 35 व 34 वर्षीय महिला, 15, 14 व सात वर्षीय मुली, 82 वर्षीय वयोवृद्ध नागरिकासह 54, 52 व 45 वर्षीय इसम, 42, 35, 34, 33, 28 वर्षीय तिघे व 22 वर्षीय तरुण, 10 व पाच वर्षीय मुले, नांदूर खंदरमाळ येथील 55 व 52 वर्षीय महिलांसह 39, 36, 35 वर्षीय दोघे, 34, 31, 30 व 26 वर्षीय तरुण व अकरा वर्षीय मुलगा, पिंपळगाव देपा येथील 65, 45 व 27 वर्षीय महिलांसह 34 वर्षीय दोघे व 22 वर्षीय तरुण आणि 16 वर्षीय मुलगा, कुंभारवाडीतील 62 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 62, 55 व 30 वर्षीय महिला, 17 व 16 वर्षीय मुले, शिरसगाव येथील 40 वर्षीय महिलेसह 21 व 19 वर्षीय तरुण, वरवंडी येथील 46 वर्षीय इसमासह 28 वर्षीय तरुण, एठेवाडीतील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 13 वर्षीय मुलगा,
अकलापूर येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 39 वर्षीय महिला व 27 वर्षीय तरुण, भोजदरी येथील 49 वर्षीय इसम, बोटा येथील 49 व 47 वर्षीय इसम, म्हसवंडी येथील 32 वर्षीय महिला, खांबा येथील 55 वर्षीय इसम, कालेवाडीतील 31 वर्षीय महिला, जांभुळवाडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, घारगाव येथील 37 वर्षीय तरुण, हिरेवाडीतील 70 वर्षीय महिला, पिंपळगाव माथा येथील 60 वर्षीय महिलेसह 50 वर्षीय इसम, कुरकुटवाडीतील 36 वर्षीय तरुण, जांबुत येथील 38 वर्षीय तरुण, हिवरगाव पठारावरील 19 वर्षीय तरुणी, बिरेवाडीतील 28 वर्षीय तरुण, मांडवे येथील सात वर्षीय मुलगा, बोरबन येथील 55 वर्षीय इसम, कोठे बु. येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 31 वर्षीय तरुण, कुरकुंडी येथील 34 वर्षीय महिला व पिंपळदरी येथील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
आज आढळलेले उर्वरीत रुग्ण तालुक्यातील अन्य 29 गावे व वाड्यावस्त्त्यांमधून समोर आले असून त्यात वेल्हाळे येथील 58 वर्षीय इसमासह 46 व 40 वर्षीय महिला, चिंचोली गुरव येथील 32 वर्षीय तरुण, निमगाव जाळीतील चार वर्षीय बालक, गुंजाळवाडीतील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 56 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुणी व 14 वर्षीय मुलगी, अंभोरे येथील 21 वर्षीय तरुणी, माळेगाव हवेलीतील 55 वर्षीय महिला, 52 वर्षीय इसम आणि 27 व 20 वर्षीय तरुण, चंदनापूरीतील 34 वर्षीय महिलेसह 29 वर्षीय तरुण, मंगळापूर येथील 50 व 30 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 30 वर्षीय तरुण, 21 वर्षीय तरुणी व दोन वर्षीय बालिका, धांदरफळ मधील 78 व 30 वर्षीय महिलांसह 58 वर्षीय इसम, 37 व 28 वर्षीय तरुण, कौठे कमळेश्वर येथील 47 वर्षीय इसम, पानोडी येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 38 वर्षीय तरुण, आनंदवाडीतील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 26 वर्षीय तरुण, नान्नज दुमाला येथील 70 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, तिगांव येथील 24 वर्षीय तरुण,
दाढ खुर्द येथील 45 वर्षीय इसमासह 35 व 32 वर्षीय महिला, खळी येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सादरपूर येथील 42 वर्षीय तरुण, पिंपरणे येथील 36 वर्षीय तरुण, ओझर खुर्द येथील 53 वर्षीय महिला, निमज येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 70 वर्षीय महिला, कोल्हेवाडीतील 28 वर्षीय तरुण, ढोलेवाडीतील 45 वर्षीय महिलेसह 18 वर्षीय तरुण, निमगाव बु. येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, औरंगपूर येथील 47, 45 वर्षीय तिघी, 40 व 27 वर्षीय महिला आणि 27 वर्षीय तरुण, मालदाड येथील 50 वर्षीय इसम, आश्वी खर्दमधील 60 वर्षीय महिलेसह 58 व 56 वर्षीय इसम, 25 व 20 वर्षीय तरुण आणि 20, 16 व 10 वर्षीय मुले, पिंपरी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 65 वर्षीय महिला व 33 वर्षीय तरुण व धांदरफळ बु. येथील 45 वर्षीय महिला. त्यासोबतच अन्य ठिकाणच्या पाच रुग्णांमध्ये अहमदनगर येथील 82 व 38 वर्षीय महिला व अकोले तालुक्यातील गणोरे येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 53 वर्षीय इसम व 52 वर्षीय महिलांचा त्यात समावेश आहे.
जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये वाढलेल्या संक्रमणाने दोन दिवसांच्या दिलाशानंतर जिल्ह्याला पुन्हा हजाराच्या पार नेले असून आज जिल्ह्यातील 1 हजार 50 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालातून जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये शंभराहून अधिक रुग्ण समोर आले असून त्यात सर्वाधीक 154 संगमनेर, 137 पारनेर, 132 शेवगाव व 126 कर्जत तालुक्यातील आहेत. जिल्ह्यातील उर्वरीत तालुक्यात जामखेड 92, नगर ग्रामीण 54, श्रीगोंदा 49, अकोले 48, नेवासा 39, पाथर्डी 38, राहाता व राहुरी प्रत्येकी 37, श्रीरामपूर 33, कोपरगाव 32, अहमदनगर महापालिका क्षेत्रात 25, अन्य जिल्ह्यातील 15 व भिंगार लष्करी परिसरातील दोघांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 99 हजार 210 झाली आहे. आज राज्यातील सर्वाधीक रुग्णवाढ होणार्या जिल्ह्यात अहमदनगर जिल्हा दुसर्यास्थानी पोहोचला आहे.