कोपरगावमध्ये मंगळवारी आठ बाधित सापडले

कोपरगावमध्ये मंगळवारी आठ बाधित सापडले
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगावमध्ये मंगळवारी (ता.8) खासगी तपासणीत आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.


यामध्ये लक्ष्मीनगर दोन, करंजी एक, कोळपेवाडी दोन, टाकळी फाटा एक, संजयनगर एक, धारणगाव रस्ता एक असे आठ रुग्ण खासगी तपासणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात 17 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना यशस्वी उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी 15 रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यात सर्व निगेटिव्ह अहवाल आले आहेत. तर नगर येथे 39 स्राव तपासणीसाठी पाठविलले आहे, अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

Visits: 167 Today: 1 Total: 1919496

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *