दुर्गा तांबे यांचा वाढदिवस वृक्ष संवर्धन दिन म्हणून साजरा! एकादशी निमित्ताने संगमनेरात २५२५ झाडांचे रोपण नायक वृत्तसेवा, संगमनेर माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहराने स्वच्छ, व सुरक्षित शहर म्हणून राज्यात लौकिक मिळवला आहे. नागरिकांना आधुनिक व चांगल्या सुविधा देण्याबरोबर नगरपालिकेने स्वच्छतेत देश पातळीवरील अनेक पुरस्कार मिळवले आहेत. माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीच्यानिमित्त शहरात २५२५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. यानिमित्त रविवार तालुक्यात वृक्ष संवर्धन दिन म्हणून साजरा करण्यात आला. शहरातील समता नगर, मार्केट कमिटी, पवार मळा, गंगामाई घाट यांसह विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ.मैथिली तांबे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला अभंग यांच्यासह शहरातील विविध महिला कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख असलेल्या दुर्गा तांबे या अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस करत असून या वाढदिवसानिमित्त यावर्षी शहरात २५२५ वृक्षांचे रोपण करण्यात आले व या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक कार्यकर्त्यांवर देण्यात आली आहे. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व संवर्धनाची जबाबदारी कार्यकर्ते घेत असून हा दिवस तालुक्यात वृक्ष संवर्धन दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा झाला. चौकट : मागील दहा वर्षांमध्ये संगमनेर शहरांमध्ये विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. रस्त्यांच्या दुतर्फा फुल, झाडे याचबरोबर मोकळ्या जागेमध्ये झाडे रोपण करण्यात आले आहे. आज ही झाडे मोठी झाली असून उन्हाळ्यामध्ये नागरिकांना या झाडांची छान गार सावली मिळत आहे.
नायक वृत्तसेवा, संगमनेर माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहराने स्वच्छ, व सुरक्षित शहर म्हणून राज्यात लौकिक
Read more


