स्व.रामदास पा.धुमाळ युवा मंचची स्थापना करणार ः धुमाळ

स्व.रामदास पा.धुमाळ युवा मंचची स्थापना करणार ः धुमाळ
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील नानांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी लोकनेते स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ युवा मंचची स्थापना करणार असल्याची घोषणा मुसळवाडीचे लोकनियुक्त सरपंच अमृत धुमाळ यांनी नुकतीच केली आहे.


मुसळवाडी (ता.राहुरी) येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पंढरीनाथ पवार, नानासाहेब पवार, भास्कर जाधव, अशोक ढोकणे, डॉ.जयंत कुलकर्णी आदिंसह मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना धुमाळ म्हणाले, राहुरी तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचे काम स्व.रामदास पाटील धुमाळ यांनी केले आहे. सध्या त्यांच्या निधनानंतर तालुक्यामध्ये अनेक स्थलांतरे झाली आहेत. रामदास धुमाळ हे स्वतःच एक संघर्षशील विचार होते, त्यांनी आयुष्यभर हुकूमशाहीच्या विरोधात लढा देऊन सर्वसामान्य गरिबातील गरीब कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम केले. मुळा-प्रवरा, राहुरी कारखाना, छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, लक्ष्मीनारायण ट्रस्ट आणि इतरही संस्थाच्या माध्यमातून तालुक्यातील युवकांना नोकरी देण्याचे काम केले. आज ते नेतृत्व मावळले असल्याने कार्यकर्ते नेतृत्वहीन झाले आहेत. गोंधळून गेलेले आहेत; सर्वांना पुन्हा एकदा एका छत्राखाली आणून सन्मानाने उभे करण्यासाठी आम्ही लोकनेते स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ युवा मंचची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अमृत धुमाळ म्हणाले.

Visits: 207 Today: 1 Total: 1098396

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *