विसर्जनाच्या दिवशीही संगमनेरकरांच्या उत्साहावर विरजण..! एका मृत्यूसह तब्बल बेचाळीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात कोविड विषाणूंचा हैदोस सुरुच असून काही क्षणांपूर्वी संगमनेर शहरातील माळीवाडा परिसरात राहणाऱ्या 70 वर्षीय इसमाच्या मृत्यूचे वृत्त सहन होत असतानाच आता तालुक्यातील 42 जण बाधित असल्याचे समोर आले आहे. आज गणेश विसर्जनाच्या दिवशी संगमनेरकर उत्साहात असताना टप्प्याटप्प्याने दोन धक्कादायक वृत्त समोर आल्याने संगमनेरकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज तालुक्याच्या रुग्ण संख्येत तब्बल 42 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची रुग्णसंख्या 1 हजार 762 वर जाऊन पोहोचली आहे.
आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गेल्या 26 ऑगस्ट रोजी बाधित असल्याचे समोर आलेल्या माळीवाडा परिसरातील 70 वर्षीय इसमाचा कोविड विषाणूंनी बळी घेतल्याचे वृत्त समोर आले. त्यामुळे दिवसभर कोविडच्या दहशतीतही गणेश विसर्जनाचा आनंद घेणाऱ्या संगमनेरकरांवर शोककळा पसरली. हा धक्का सहन होत असताना नासंगमनेरकरांना आता पुन्हा एकदा दुसरा धक्का बसला असून या धक्क्यातून संगमनेर तालुक्यातील 42 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्याच्या रूग्ण संख्येत आजच्या उत्सवाच्या दिवशीही मोठी भर पडली आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेकडून 24 तर खासगी प्रयोगशाळेकडून अठरा जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत. त्यात शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या 33 वर्षीय महिला, माळीवाडा परिसरात राहणाऱ्या 51 वर्षीय इसम, तसेच तालुक्यातील कनोली येथील साठ व 46 वर्षीय इसम, घुलेवाडी येथील 38 वर्षीय महिला, रहिमपूर येथील दोन व चार वर्षीय बालकांसह सहा वर्षीय बालिका, 60, 38, 34 वर्षीय पुरुष ढोलेवाडीतील 54 वर्षीय महिला, कौठे धांदरफळ येथील 91 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 62, 34, 33 व 27 वर्षीय इसमासह 55, 33, 23 व 22 वर्षीय महिला, सहा वर्षीय बालक, कुरकुटवाडी येथील 61 वर्षीय जेष्ठ नागरिक, वाघापूर येथील 55 वर्षीय इसम बाधित असल्याचे समोर आले आहे.
तर, खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून शहरातील साईबन कॉलनी परिसरातील 52 वर्षीय महिला व तीस वर्षीय तरुण, कुंभार आळा येथील तीस वर्षीय तरुण, गोविंद नगर परिसरातील 36 वर्षीय तरुण, मालदाडरोड परिसरातील 52 व 37 वर्षीय महिला, शिवाजीनगर परिसरातील 31 वर्षीय महिला, नाईकवाडपुरा परिसरातील 51 वर्षीय पुरुष, बाजारपेठ परिसरातील 52 वर्षीय पुरुष बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यासोबतच या अहवालातून तालुक्यातील घारगाव येथील 61 वर्षीय पुरुष, माळेगाव पठार येथील 33 वर्षीय तरुण, पिंपरणे येथील 24 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथील 67 वर्षीय पुरुष, धांदरफळ येथील 32 वर्षीय तरुण, दाढ खुर्द येथील 53 वर्षे पुरुष, वडगाव पान येथील 43 वर्षीय तरुण, जाखोरी येथील 59 वर्षीय पुरुष व चिंचोली गुरव येथील 52 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही तब्बल 42 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची रुग्णसंख्या अठराव्या शतकाच्या दिशेने अग्रेसर होत 1 हजार 762 वर जाऊन पोहोचली आहे.
आज गणेश विसर्जनाचा उत्साहाचा दिवस मात्र, कोविड विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या उत्सवाला मर्यादा आल्याने आज सकाळ पासून अगदी मर्यादेत राहत संगमनेरकर या उत्सवाचा आनंद घेत असतानाच सायंकाळी सातच्या सुमारास माळीवाडा परिसरात राहणाऱ्या 70 वर्षीय इसमाच्या मृत्यूचे वृत्त धडकल्याने संगमनेरच्या उत्साहाला गालबोट लागले. हा धक्का सहन करीत असतानाच शहरातील 11 जणांसह तालुक्याच्या रूग्ण संख्येत तब्बल 42 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची बाधित संख्या अठराव्या शतकाच्या दिशेने अग्रेसर होत 1 हजार 762 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत कोविडने संगमनेर शहरातील 12 जणांसह 27 जणांचे बळी घेतले आहे.