मंदिरांमध्ये प्रवचन-कीर्तनास परवानगीची मागणी

मंदिरांमध्ये प्रवचन-कीर्तनास परवानगीची मागणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
मंदिरांमध्ये प्रवचन-कीर्तन करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी मंच महाराष्ट्र राज्यच्या नेवासा तालुका वारकरी मंचने तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे.


पंढरीच्या पांडूरंगाचे मंदीर खुले करण्यात यावे, राज्यातील सर्व मंदीरे दर्शनासाठी खुले करून द्यावीत, मंदिरामध्ये कीर्तन-प्रवचने अनेक महिन्यांपासून बंद असून ती सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य वारकरी मंचचे संस्थापक अध्यक्ष नीलेश महाराज कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर वारकरी मंच व नेवासा तालुका वारकरी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन देतेवेळी रामायणाचार्य देविदास महाराज आडभाई, भूषण महाराज खरवंडीकर, रामेश्वर महाराज राऊत, विजय महाराज पवार, शिवप्रसाद महाराज पंडीत, माजी शिक्षक राम कर्जुले, राम महाराज खरवंडीकर, रामभाऊ महाराज तावरे, जनार्धन राशीनकर, किशोर महाराज चव्हाण, शिवाजी पुंड, गणेश नागरे आदी उपस्थित होते.

Visits: 137 Today: 1 Total: 1980713

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *