पतंबाजीसाठी पारंपारिक साधा धागा वापरा ः गवळी
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरात पतंगबाजीसाठी नायलॉन धागा वापरण्यास व बाळगण्यास बंदी असून साधा पारंपारिक धागा वापरण्याचे आवाहन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी केले आहे.
पतंगबाजीसाठी नायलॉन अथवा तंगुस धागा वापरणारे किंवा बाळगणारे यांच्यावर यापुढे कडक कारवाई होणार असून लहान मुलांकडे नायलॉन अथवा तंगुस धागा आढळून आल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई होणार आहे. तसेच शहरातील ज्या इमारतींवर नायलॉन धागा आसारी आढळून येईल. त्या इमारत मालकांवर कारवाई होणार आहे. नायलॉन अथवा तंगुस धागा वापरणार्या किंवा त्याचा साठा करणार्या व्यक्तींची माहिती शहर पोलीस ठाण्याला द्यावी, संबंधित इसमाचे नाव गोपनीय ठेवून त्याला योग्य ते बक्षीसही दिले जाईल. न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन करुन शहरातील नागरिकांना पोलिसांनी मकर संक्रांती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.