जिल्ह्यातील सर्वाधिक रॅपिड अँटीजेन चाचण्या संगमनेरात! तालुक्याच्या रुग्णसंख्येला लागलेली ओहोटी कायम, शुक्रवारी आढळले चौदा रुग्ण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यात कोविडला लागलेली आहोटी कायम असून अधुनमधून एखादा धक्का देत रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक लोकसंख्येच्या अहमदनगर महापालिका क्षेत्रापेक्षा संगमनेर तालुक्यात रॅपिड अँटीजेनच्या चाचण्या अधिक प्रमाणात करण्यात आल्या असून त्याद्वारे समोर आलेला पॉझिटिव्ह निष्कर्षही नगरपेक्षा खूप कमी आहे. रुग्णसंख्या घटीचा सिलसिला शुक्रवारीही अबाधित असून शहरातील चौघांसह एकूण चौदा रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 4 हजार 226 वर पोहोचली आहे. शुक्रवारी (ता.30) रॅपिड अँटीजेनद्वारा केवळ दोघांचे तर खासगी प्रयोगशाळेकडून बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. आत्तापर्यंत संगमनेर तालुक्यातील 14 हजार 324 जणांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून त्यातून 14.58 च्या गतीने 2 हजार 88 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 12 हजार 236 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

संक्रमित झालेले रुग्ण जलदगतीने समोर येवून कोविडचा प्रादुर्भाव रोखता यावा यासाठी झटपट निष्कर्ष देणार्‍या रॅपिड अँटीजेनचा वापर करुन राज्यभर कोविड विरोधातील लढ्याला बळ देण्यात आले. या लढाईत अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरने प्रथम क्रमांक पटकाविला. आत्तापर्यंत संगमनेरच्या आरोग्य यंत्रणेला 17 हजार 275 रॅपिड चाचणीच्या किट प्राप्त झाल्या. त्यातील 14 हजार 324 किटचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला. त्यातून 14.58 च्या सरासरी गतीने केवळ 2 हजार 88 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 12 हजार 236 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. या चाचणीद्वारे रुग्ण समोर येण्याच्या गतीतही संगमनेरचा पाचवा क्रमांक आहे.

जिल्ह्यातील अन्य तालुक्यात रॅपिड अँटीजेनद्वारा केलेल्या चाचण्या व त्याद्वारे समोर आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे आहेत. संगमनेर पाठोपाठ राहाता तालुक्यात 11 हजार 970 जणांची चाचणी करण्यात आली, त्यातून 17.63 सरासरीनेे 2 हजार 110 रुग्ण. अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 11 हजार 586 जणांच्या चाचणीतून 19.43 सरासरीने 2 हजार 251 रुग्ण. पाथर्डी तालुक्यातील 10 हजार 951 चाचण्यांमधून 19.58 सरासरीनेे 2 हजार 144 रुग्ण. जामखेड तालुक्यातील 10 हजार 349 जणांच्या चाचणीतून 15.52 सरासरीने 1 हजार 606 रुग्ण. कोपरगाव तालुक्यातून 10 हजार 327 चाचण्यातून 15.44 सरासरीने 1 हजार 595 रुग्ण, अकोले तालुक्यातील 10 हजार 311 चाचण्यांतून 12.44 सरासरीने 1 हजार 283 रुग्ण.

शेवगाव तालुक्यातील 9 हजार 553 चाचण्यांमधून 14.93 सरासरीने 1 हजार 426 रुग्ण. पारनेर तालुक्यातील 9 हजार 243 चाचण्यांतून 11.94 सरासरीने 1 हजार 104 रुग्ण. नेवासा तालुक्यातील 8 हजार 129 चाचण्यांतून 18.23 सरासरीने 1 हजार 482 रुग्ण. राहुरी तालुक्यातील 8 हजार 111 चाचण्यातून 11.65 सरासरीने 945 रुग्ण. श्रीगोंदा तालुक्यातील 7 हजार 888 चाचण्यांतून 18.97 सरासरीने 1 हजार 496 रुग्ण. कर्जत तालुक्यातील 7 हजार 760 चाचण्यांतून 20.10 सरासरीने 1 हजार 560 रुग्ण. नगर ग्रामीण क्षेत्रातून 7 हजार 579 चाचण्यांतून 11.58 सरासरीने 878 रुग्ण. श्रीरामपूर तालुक्यातील 6 हजार 928 चाचण्यांतून 18.71 सरासरीने 1 हजार 296 रुग्ण. लष्करी परिसरातून 2 हजार 543 चाचण्यांतून 17.66 सरासरीने 449 रुग्ण व जिल्हा रुग्णालयातील 712 चाचण्यांमधून 27.39 सरासरीने 195 रुग्ण अशा एकूण 1 लाख 48 हजार 264 चाचण्यांमधून सरासरी 16.13 गतीने जिल्ह्यातील 23 हजार 908 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1 लाख 24 हजार 356 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यासह तालुक्यातील कोविड स्थिती जवळपास नियंत्रणात आली असून रुग्णसंख्या मर्यादित झाल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे. शुक्रवारी (ता.30) प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील अभंग मळा येथील 54 वर्षीय महिला, पार्श्वनाथ गल्लीतील 44 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी रस्त्यावरील 25 वर्षीय तरुण व महात्मा फुले चौकातील 55 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यासोबतच डोळासणे येथील 44 वर्षीय महिला. कोळवाडे येथील 44 वर्षीय तरुण, निमगाव टेंभी येथील 55 वर्षीय इसम, रायतेवाडी येथील 71 वर्षीय महिला, निमोण येथील 48 वर्षीय इसम, जोर्वे येथील 69 वर्षीय इसम, रायते येथील 58 वर्षीय इसम, पिंपरणे येथील 52 वर्षीय इसम, राजापूर येथील 41 वर्षीय महिला व सुकेवाडी येथील 40 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत शुक्रवारी 14 रुग्णांची भर पडून तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या आता 4 हजार 226 वर पोहोचली आहे.


गेल्या 30 दिवसांत संगमनेर तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत 979 रुग्णांची भर पडली. त्यातील 187 रुग्ण शहरी तर 792 रुग्ण ग्रामीणभागातील आहेत. दररोज समोर येणार्‍या रुग्णसंख्येत शहरी रुग्ण समोर येण्याचे प्रमाण 19.10 टक्के तर ग्रामीण रुग्ण समोर येण्याचे प्रमाण 80.90 टक्के आहे. महिन्याभरात दररोज 32.63 टक्के गतीने एकूण, 6.23 टक्के गतीने शहरी व 26.4 टक्के गतीने ग्रामीणभागातील रुग्ण समोर येत आहेत. या महिन्यात रॅपिड अँटीजेन चाचणीतून 661, शासकीय प्रयोगशाळेतून 14 तर खासगी प्रयोगशाळेतून 304 रुग्ण निष्पन्न झाले आहेत.

Visits: 91 Today: 1 Total: 1107180

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *