‘वनिता पेंटस्’ रंगदालनाचा दिमाखात शुभारंभ
‘वनिता पेंटस्’ रंगदालनाचा दिमाखात शुभारंभ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील बाजारपेठेच्या वैभवात आणखी एका रंगदालनाची भर पडली आहे. विजयादशमीचा शुभमुहूर्त साधून अकोले बाह्यवळण मार्गानजीक असणार्या स्वयंवर मंगल कार्यालय समोर साईकृपा कन्स्ट्रक्शन केमिकल्सच्या माध्यमातून ‘वनिता पेंटस्’ या रंगदालनाचा शुभारंभ राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाला.

याप्रसंगी आमदार डॉ.सुधीर तांबे, महानंद आणि राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, दूध संघाचे संचालक लक्ष्मण कुटे, पंचायत समिती उपसभापती नवनाथ अरगडे, कुटे लॉन्सचे संचालक गोरख कुटे, के. के. थोरात आदी उपस्थित होते. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले निवृत्ती सातपुते यांनी जिद्दीतून रंगकाम आणि वॉटर प्रूफींगची कामे करुन वनिता पेंटस् या रंगदालनाची उभारणी केली आहे. त्यांच्या या जिद्दीला आणि मेहनतीला उपस्थित सर्वांनी दाद देत पुढील व्यावसायिक वाटचालीस भरभरुन शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्तात्रय सातपुते, जालिंदर खर्डे यांसह हितचिंतक उपस्थित होते.

