जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान सामूहिक जबाबदारी : आ. खताळ

नायक वृत्तसेवा, तळेगाव दिघे
देशाची प्रगती जितकी महत्त्वाची आहे, तितकीच देशाच्या सीमांची सुरक्षा सुद्धा महत्त्वाची आहे.ही सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी जीवाची पर्वा न करता, ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता, आपल्या कुटुंबापासून दूर राहून भारतीय जवान सीमेवर देशाचे रक्षण करत असतात. त्यामुळे आपण सर्वजण सुरक्षित आहोत. त्यामुळे भारतीय जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.

कारगिल दिनानिमित्त संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील हुतात्मा स्मारकास आ. अमोल खताळ यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले तसेच माजी सैनिक व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मेजर राजेंद्र गुंजाळ, मेजर रामनाथ दिघे, सुनील दिघे, भाऊसाहेब दिघे,आबासाहेब भागवत, महेश दिघे, मच्छिंद्र दिघे, गणेश दिघे, सोपान कांदळकर, तात्यासाहेब राहणे, संदीप क्षीरसागर, तळेगावचे प्रभारी सरपंच मयूर दिघे, भाजप नेते अमोल दिघे, दत्तात्रय दिघे, पंढरीनाथ इल्हे, रवींद्र दिघे, रामदास दिघे, संजय कवडे, निलेश दिघे, डॉ. संतोष डांगे, उत्तम दिघे, दत्ता दिघे, ज्ञानेश्वर जानेकर, राजेश दिघे, अतुल कदम, गोरख इल्हे, राहुल उकिर्डे, अशोक दिघे, विलास दिघे, विनायक कांदळकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले, आपण सुरक्षितपणे आपले जीवन जगत आहोत, त्यामागे या जवानांचे अमूल्य योगदान आहे.मात्र काही गावात दुर्दैवाने जवानांच्या कुटुंबीयांना समाजाकडून त्रास दिला जातो, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.त्यामुळे प्रत्येकाने भारतीय जवानांचा व त्यांच्या कुटुंबाचा आदर राखणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बिरोबा महाराजांच्या मंदिरामध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्याच शनिवारी आमदार अमोल खताळ यांनी दर्शन घेत आशीर्वाद घेतले. त्यानंतर कारगिल दिनानिमित्त बिरोबा मंदिराच्या परिसरात आ. खताळ आणि माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष संवर्धनाची जबाबदारी गावातील वृक्षप्रेमी नागरिकांनी घ्यावी असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी यावेळी केले.

Visits: 70 Today: 2 Total: 1098343
