मंदिरे उघडली नाहीतर टाळे तोडून दर्शन घेऊ; विश्व हिंदू परिषद
मंदिरे उघडली नाहीतर टाळे तोडून दर्शन घेऊ; विश्व हिंदू परिषद
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र सरकारने जनतेचे श्रध्दास्थान असलेली मंदिरे उघडली नाही, तर विजयादशमीपासून (ता.25) ‘टाळे तोड’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने राज्य सरकारला निवेदनाद्वारे दिला आहे.
कोरोना महामारीच्या काळात मठ, मंदिरे, गुरूद्वारा, जैन मंदिर/स्थानक, आश्रम यांचे दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यामूळे विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने आज (ता.24) सायंकाळी 4 वाजता ‘सभी हिंदू एक सूर मे बोलो सरकार हमारे मंदिर खोलो’, अशा घोषणा देऊन संगमनेरातील प्रमुख मंदिरांच्या बंद दरवाजांपुढे घंटानाद आंदोलन केले. दरम्यान, आज सायंकाळी 4 ते 5 गावातील रंगारगल्ली येथील प्रमुख मंदिरे शनि मंदीर, मारुती मंदीर, सोमेश्वर मंदीर, दत्त मंदीर, स्वामी समर्थ मंदीर, बस स्थानकाजवळील दत्त मंदीर व गुरूद्वारा तसेच पार्श्वनाथ गल्लीतील जैन मंदीर येथे घंटानाद करून ‘उठो हिंदू अब करो गर्जना मंदिर मे फिर शुरू हो पूजा अर्चना’, ‘जिस मंदिरो ने धन दिया उसी को तुमने बंद किया’, ‘एक ही लक्ष एक ही मांग खोल दो फिर से मंदिर सरकार’ अशा घोषणा देवून प्रांताधिकारी व तहसीलदार यांना रविवार दि.25 ऑक्टोबरपर्यंत मठ-मंदिरे न उघडल्यास टाळे तोडून दर्शन घेण्यात येईल, असे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर प्रशांत बेल्हेकर, सचिन कानकाटे, कुलदीप ठाकूर, विशाल वाकचौरे, आकाश राठी, गोपाल राठी, गणेश बंगाळ, आशिष ओझा, रवी मंडलिक, शुभम कपिले, संदीप वारे, रमेश शहरकर, शिरीष मुळे, राजेंद्र देशपांडे, शशीकांत संत, राहुल भोईर, किशोर गुप्ता, वाल्मिक धात्रकसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यांच्या सह्या आहेत.