संगमनेरकरांना वस्तूंची ‘एफबी’ अॅपद्वारे घरबसल्या खरेदी करता येणार…
संगमनेरकरांना वस्तूंची ‘एफबी’ अॅपद्वारे घरबसल्या खरेदी करता येणार…
नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील राहुल खताळ आणि रोहन वैद्य या दोन होतकरु तरुणांनी आधुनिकतेची नस ओळखून नागरिकांना घरबसल्या जीवनावश्यक वस्तू कशा खरेदी करता येतील यासाठी एक अॅप तथा वेबसाईटची निर्मिती केली आहे. यामुळे नागरिकांना घरबसल्या वस्तूंची खरेदी करण्याची सुविधा विजयादशमीच्या शुभमुर्हूतापासून उपलब्ध होणार आहे.
कोरोनाने जगाला भरपूर काही शिकवलं. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित आणि आरोग्यदायी जीवन. यासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. गर्दी टाळणे आणि घराबाहेर पडताना मुखपट्टी (मास्क) वापरणं बंधनकारक राहणार आहे. दरम्यान, दसरा (विजयादशमी) आणि दिवाळी सण अगदी जवळ येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर किराणा, स्वयंपाकाचे साहित्य, बेकरी प्रॉडक्ट, भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून राहुल खताळ आणि रोहन वैद्य या दोन तरुणांनी नागरिकांना घरबसल्या जीवनावश्यक वस्तू कशा खरेदी करता येतील यासाठी एक अॅप व वेबसाईटची निर्मिती केली आहे. याद्वारे सेंद्रीय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला, डेअरी प्रॉडक्ट, बेकरी उत्पादने मिळणार आहेत. त्यामुळे आजच प्ले-स्टोअरला जाऊन ‘एफबी’ अॅप डाऊनलोड करा आणि घरबसल्या खरेदीचा आनंद सणासुदीत द्विगुणित करा असे आवाहनही खताळ व वैद्य या तरुणांनी केले आहे.