… अन्यथा ‘रासप’ पक्ष तीव्र आंदोलन छेडेल ः बाचकर
… अन्यथा ‘रासप’ पक्ष तीव्र आंदोलन छेडेल ः बाचकर
नायक वृत्तसेवा, राहुरी
ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांच्या खात्यावर एकरी सरसकट पन्नास हजार रुपये जमा करावेत. अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा जिल्हाध्यक्ष शरद बाचकर यांनी दिला आहे.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी राहुरी तहसील कार्यालयासमोर रासपच्यावतीने नुकतेच आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना बाचकर म्हणाले, अतिवृष्टीमुळे पिके भुईसपाट झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. या आंदोलनात राजेंद्र बेल्हेकर, कपील लाटे, सुवर्णा जर्हाड, राजू भुसारी, नानासाहेब कोळपे, मालुजी तिखोले, ठकाजी बाचकर, भारत बाचकर, मिनीनाथ बाचकर, अशोक होडगर, मयूर वीरकर, तात्या बाचकर, अभिमन्यू बाचकर सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना निवेदन देण्यात आले.