शेवगावच्या सिंडीकेट बँकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप
शेवगावच्या सिंडीकेट बँकेच्या कारभाराबाबत तीव्र संताप
नायक वृत्तसेवा, शेवगाव
येथील सिंडीकेट बँकेची शाखा ‘असून अडचण, नसून खोळंबा’ ठरत आहे. त्यात गेल्या चार महिन्यांपासून शाखेतील एटीएम सुविधा बंद असून, ग्राहकांनी केलेल्या तक्रारीला वरीष्ठ अधिकार्यांनी केराची टोपली दाखविली आहे. यामुळे बँक कारभारावर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शेवगाव शहरातील मार्केटयार्ड समोरील पाथर्डी रस्त्यावर सिंडीकेट बँकेची शाखा आहे. या शाखेत हजारो ग्राहकांचे दैनंदिन व्यवहार होतात. परंतु शेवगावकरांसाठी ही बँक सध्या डोकेदुखी ठरत आहे. गेल्या चार महिन्यांपासून बँकेची एटीएम सेवा बंद असून, कर्मचारी संख्याही अपुरी आहे. यामुळे कर्मचारी व ग्राहकांत ‘तु तु मै मै’ होत आहे. एकीकडे सेवेचा अभाव तर दुसरीकडे कर्मचार्यांचे ग्राहकांची गैरवर्तन होत असल्याने सर्व सामान्य ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याची बँक व्यवस्थापन अथवा वरीष्ठ अधिकार्यांनी तत्काळ दखल घेऊन ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.