दूध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत ः थोरात राजहंस दूध संघाची ४६ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राजहंस दूध संघाने कायम दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोठी मदत केली आहे. आगामी काळात कमी गाईंमध्ये गुणवत्तापूर्ण जास्त दूध उत्पादन निर्माण करून सहकारी संघाचे दूध संकलन वाढविले पाहिजे. यामधून मागील वर्षात ४०० कोटी रुपये शेतकर्‍यांना मिळाले असून दूध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुतीसह रोजगार निर्माण झाला असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख हे होते. तर व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधव कानवडे, इंद्रजीत थोरात, बाबासाहेब ओहोळ, शंकर खेमनर, सुधाकर जोशी, संपत डोंगरे, दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, संचालक लक्ष्मण कुटे, आर. बी. रहाणे, विलास वर्पे, भास्कर सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबन कुर्‍हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, प्रतिभा जोंधळे, मंदा नवले, भारत मुंगसे, डॉ. प्रमोद पावसे, कार्यकारी संचालक डॉ. सुजीत खिलारी यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार थोरात म्हणाले, दूध व्यवसायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठा वाटा उचलला असून सहकारी दूध संघाचा यावर्षी ५३० कोटींचा टर्नओव्हर हा अत्यंत कौतुकास्पद ठरणारा असून ४०० कोटी रुपये थेट शेतकर्‍यांच्या पदरात मिळाले आहे. राजहंस दूध संघाने कायम दूध उत्पादक, शेतकरी यांना मोठी मदत केली आहे. उच्चांकी भाव देण्याबरोबरच दूध उत्पादन वाढीसाठी विविध योजना राबवल्या आहेत. सहकारी दूध संघामुळे खाजगींवर नियंत्रण आहे. हा संघ प्रत्येकाने जपला पाहिजे. कोरोना काळात रणजीतसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून सरकारने दररोज दहा लाख लिटरची दूध पावडर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे एकही दिवस संघ बंद राहिला नाही. यापुढील काळात खासगी दूध संघाच्या आमिषाला बळी न पडता सर्व उत्पादकांनी सहकारी संघ जपला पाहिजे. तसेच कमी गाईंमध्ये जास्त गुणवत्तेचे दूध निर्माण करणे गरजेचे आहे. यामुळे उत्पादन खर्चही कमी होईल आणि दुधाला चांगला भावही मिळेल. राजहंस दूध संघाचा मुक्त संचार गोठा व मुरघास पॅटर्न हा राज्यभर राबवला जात असल्याचेही ते म्हणाले. या बैठकीचे नोटीस वाचन कार्यकारी संचालक डॉ. सुजीत खिलारी यांनी केले. स्वागत उपाध्यक्ष राजेंद्र चकोर यांनी केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. सुरेश जोंधळे व नामदेव कहांडळ यांनी केले तर विलास कवडे यांनी आभार मानले.

सरकारने दूध व्यवसायालाही संरक्षण द्यावे ः देशमुख
ऊस आणि दूध हे शाश्वत व्यवसाय आहे. साखर व्यवसायात मोठे शेतकरी आहेत. मात्र दूध व्यवसायात लहान कुटुंबे आहेत. राज्यामध्ये दीड कोटी कुटुंब तर देशात आठ कोटी कुटुंब दूध व्यवसायात असून या व्यवसायाने ग्रामीण जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे. मात्र सरकार साखर व्यवसायाला जशी तातडीने मदत केली जाते तशी मदत दूध व्यवसायाला करत नसल्याची खंत राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *