सावळीविहीरमध्ये जावयाने तिघांची केली हत्या तिघे गंभीर जखमी; नाशिकमधून दोघांना केली अटक


नायक वृत्तसेवा, शिर्डी
कौटुंबिक वादातून जावयाने सासरवाडीच्या सहा जणांना चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना शिर्डी परिसरात सावळीविहीर येथे गुरुवारी (ता.२१) मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास घडली. यात पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

पत्नी सतत माहेरी जायची. आपल्या संसासारत सासुरवाडीच्या मंडळीचा हस्तक्षेप वाढत आहे. या संशायवरून आणि रागातून जावयाने हे कृत्य केल्याची माहिती आहे. जो दिसेल त्याच्यावर तो चाकून वार करीत होता. यामध्ये सहाजण जखमी झाले. तर वर्षा निकम, रोहित गायकवाड आणि हिराबाई गायकवाड यांचा मृत्यू झाला. आरोपीचा संपूर्ण कुटुंबच संपविण्याचा डाव असल्याचं त्याच्या कृतीतून दिसून येते. घराचा दरवाजा उघडताच तो दिसेल त्याच्यावर वार करत सुटला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पत्नी, मेव्हणा आणि आजेसासू अशा तिघांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. तर या घटनेत संशयिताची सासू, सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याची माहिती आहे.

वर्षा सुरेश निकम (संशयिताची पत्नी, वय २४), रोहित चांगदेव गायकवाड (मेव्हणा, वय २५), हिराबाई द्रौपद गायकवाड (आजेसासू, वय ७०) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तसेच चांगदेव द्रोपद गायकवाड (सासरे, वय ५५), संगीता चांगदेव गायकवाड (सासू, वय ४५), योगिता महेंद्र जाधव (मेव्हणी, वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी संशयित सुरेश निकम याला पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वर्षा गायकवाड हिचा विवाह संगमनेर खुर्द येथील सुरेश निकम याच्याशी झाला होता. काही काळाने दोघांमध्ये कायम किरकोळ कारणामुळे वाद होत होते. वाद झाला की वर्षा ही माहेरी निघून जायची. त्यामुळे, आपल्या संसारात सासू-सासरे, मेव्हणी, मेव्हणा यांचा हस्तक्षेप वाढत चालल्याचा त्याला राग होता. वर्षाने संगमनेर पोलिसांत पतीविरूद्ध तक्रारही दिली होती. त्यानंतर ती सावळीविहीर येथे निघून गेली होती.

आरोपी सुरेश याने फोन करुन बोलावणे केले होते. मात्र, तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बुधवारी (ता.२०) आरोपीने रोशन निकम याला घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास सावळीविहीर गाठली. दार वाजवल्यावर कुटुंबियांनी दार उघडलं. तेव्हा निकम याने लगेच दिसेल त्याच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. पत्नी वर्षा पुढे आली तर तिच्यावरही त्याने हल्ला केला. निकम याने एकापाठोपाठ एक सहाजणांवर वार केले. यात पत्नी वर्षा निकम, मेव्हणा रोहित गायकवाड आणि आजेसासू हिराबाई गायकवाड यांचा मृत्यू झाला. मेव्हणी योगिता गायकवाड, सासरे चांगदेव गायकवाड व सासू संगीता गायकवाड हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी निघून गेले. ही घटना पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना समजली. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिसही रवाना झाले. गुरुवारी पहाटे पोलीस पथके संगमनेर येथे दाखल झाली. आरोपींच्या घरी जाऊन माहिती घेतली मात्र ते घरी नव्हते. त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन मुख्य आरोपी संतोष निकम व रोशन निकम यांना नाशिक येथून अटक केली.

Visits: 12 Today: 1 Total: 115151

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *