शहरातील रुग्णसंख्या घटली तर ग्रामीण भागातील वाढली..! शहरातील सात जणांसह तालुक्यातील एकोणचाळीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
ग्रामीण क्षेत्रातील संक्रमणात सुरु असलेले सातत्य आजही अबाधित असून शहरी रुग्णवाढीच्या तुलनेत तालुक्यातून अधिक रुग्ण समोर येत असल्याने एकीकडे ओहोटी तर दुसरीकडे भरती असे परस्पर विरोधाभासी चित्र गेल्या पंधरा दिवसांपासून दिसत आहे. आजही खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा समोर आलेल्या निष्कर्षातून ग्रामीण क्षेत्रात 32 तर शहरीभागातील अवघे 7 रुग्ण समोर आले आहेत. आजही तालुक्याच्या रुग्णवाढीचा टक्का काहीसा उंचावल्याने तालुका आता चार हजार रुग्णसंख्येच्या दिशेने धावू लागला असून आज रुग्णसंख्येचा पडाव 3 हजार 856 वर पडला आहे.
गेल्या 1 ऑक्टोबरपासून तालुक्याच्या रुग्णसंख्येत निश्चितच घट झाली आहे. मात्र शहरीभागात ज्या पद्धतीने अचानक बदल होवून त्यात आजही सातत्य राहीले त्या प्रमाणे ग्रामीणभागात मात्र अद्यापही संक्रमणाचा फुगलेला आकडा कायम आहे. गेल्या चौदा दिवसांत स्थानिक प्रशासनाने केलेल्या अँटीजेन चाचण्यांमधून चारशे, खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून 157 तर शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालातून नऊ अशा एकूण 566 जणांना 40.43 च्या दराने कोविडचे संक्रमण झाले आहे. यात शहरीभागातील केवळ 115 रुग्ण असून ग्रामीण क्षेत्रातून तब्बल 451 रुग्ण समोर आले आहेत. गेल्या रविवारपासून रुग्णसमोर येण्याची गती काही प्रमाणात मंदावल्याने प्रती दिवस सरासरीही खाली आली असून आजच्या स्थितीत तालुक्यात 40.43 च्या सरासराने रुग्ण समोर येत आहेत, यात शहरी भागात 8.21 तर ग्रामीण भागात 32.21 रुग्ण समोर येण्याचा सरासरी वेग आहे.
आज खाजगी प्रयोगशाळेकडून 14 जणांचे तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून 25 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात शहरातील अवघ्या सात जणांचा समावेश आहे. आज बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये इंदिरानगरमधील 56 वर्षीय महिला, नेहरु चौक परिसरातील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सावतामाळी नगर परिसरातील 33 वर्षीय तरुण, ताजणे मळ्यातील 35 वर्षीय महिला, विद्यानगर परिसरातील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 35 वर्षीय महिला व 12 वर्षीय मुलाला कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे.
त्यासोबतच आज ग्रामीण भागातील 32 जणांचे अहवाल संक्रमित असल्याचे समोर आले आहे. त्यातून भोजदरी येथील 25 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 38 वर्षीय तरुण, ढोलेवाडी येथील 52 वर्षीय इसम, घारगाव मधील 24 वर्षीय महिलेसह चार वर्षीय बालक, गुंजाळवाडी येथे 52 वर्षीय इसमासह 28 वर्षीय तरुण, 62 व 42 वर्षीय दोन महिला, जाचकवाडी येथील 24 वर्षीय महिला, जोर्वे येथील 54 वर्षीय इसम, कनोली येथील 55 वर्षीय महिला, केळेवाडी येथील 30 वर्षीय तरुण, खळी येथील 45 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथील 40 वर्षीय तरुण,
कोळवाडे येथील 50 वर्षीय इसम, नान्नज दुमाला येथील 53 वर्षीय महिला, ओझर खुर्द मधील 55 वर्षीय इसमासह 26 वर्षीय महिला व चार वर्षीय बालक, पिंपरी येथील 22 वर्षीय महिला, प्रतापपूर येथील 35 वर्षीय महिला, रहिमपूर येथील 58 वर्षीय इसम, राजापूर मधील 60 वर्षीय महिला, समनापुर मधील 48 वर्षीय इसम, तळेगाव दिघे येथील 25 वर्षीय महिला,
सारोळे पठार येथील 51 वर्षीय इसमासह 21 वर्षीय तरुण आणि 18 वर्षीय तरुणी आदी 32 जणांसह एकूण 39 जणांचे अहवाल आज संक्रमित असल्याचे प्राप्त झाले आहेत. तालुक्याच्या रुग्ण संख्येत आजही 39 रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या आता 3 हजार 856 पोहोचली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आज ९५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८ हजार २५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ९३.१२ टक्के झाले आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील रुग्ण संख्येत ४४५ बाधितांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या आता २ हजार ७७० झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८६ आणि अँटीजेन चाचणीत २०१ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ४०, अकोले ०३, जामखेड ०२, कर्जत ०१, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण १८, नेवासा ०६, पारनेर ११, पाथर्डी ०४, राहाता १४, राहुरी ०७, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर १८, लष्करी रुग्णालयातील ०९ रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ३७, जामखेड ०३, नगर ग्रामीण १३, पाथर्डी ०६, राहुरी ०४, संगमनेर १४, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०५, लष्करी रुग्णालयातील ०६ आणि इतर इतर जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे.
आज करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीतून जिल्ह्यातील २०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १६, अकोले ०५, जामखेड ११, कर्जत १३, कोपरगाव १२, नेवासा ०६, पारनेर १०, पाथर्डी ४५, राहाता १४, राहुरी ०६, संगमनेर २५, शेवगाव २२, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांंमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १८३, अकोले ५६, जामखेड ३२, कर्जत ३४, कोपरगाव ३०, नगर ग्रा. ५८, नेवासा ४५, पारनेर २५, पाथर्डी ४५, राहाता ८२, राहुरी ७२, संगमनेर १८१, शेवगाव १८, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर ४८, लष्करी परिसरातील ०३, लष्करी रुग्णालयातील १६ आणि इतर जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
- जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या : ४८ हजार २१५..
- जिल्ह्यात उपचार सुरु असलेले रुग्ण : २ हजार ७७०..
- जिल्ह्यात आत्तापर्यंत झालेले एकूण मृत्यू : ७९६..
- जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या : ५१ हजार ८२०..
- जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.१२ टक्के..
- जिल्ह्यात आज ९५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ४४५ बाधितांची रुग्णसंख्येत भर..