संगमनेरचे सहकार मॉडेल देशासाठी दिशादर्शक ः डॉ. तांबे गावोगावी प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, थोर स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जन्मदिन हा संपूर्ण संगमनेर तालुक्यात प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. आधुनिकता, शिस्त, काटकसर व पारदर्शकता ही तत्वे सहकारात रुजविणारे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांमुळे संगमनेरचे सहकार मॉडेल हे देशासाठी सदैव दिशादर्शक ठरणारे असल्याचे गौरवोद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.

संगमनेरातील अमृत उद्योग समूहाच्यावतीने कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बाजीराव खेमनर, दुर्गा तांबे, सत्यजीत तांबे, रणजीतसिंह देशमुख, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, सुधाकर जोशी, संतोष हासे, संपत डोंगरे, सीताराम राऊत, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचेसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सहकार ध्वजवंदन करून मानवंदनाही देण्यात आली.

स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गोरगरीब व सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सहकाराचा मार्ग निवडला. आयुष्यभर सहकारात सेवावृत्तीने काम करताना त्यांनी पारदर्शकता, काटकसर, आधुनिकता, स्वच्छ कारभार ही आदर्श तत्वे रुजवली. या तत्त्वांमधून संगमनेरचा सहकार फुलला. काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज संगमनेरचा सहकार हा देशासाठी दिशादर्शक ठरला आहे. दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका यामध्ये विविध संस्थांची उभारणी, रचनात्मक कार्य, गोरगरिबांचा आर्थिक सामाजिक विकास हे महत्त्वाचे काम तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी केले. वयाच्या 84 वा वर्षी पर्यावरणाचे काम करताना त्यांनी दंडकारण्य अभियान राबवले. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून मोठे हॉस्पिटल सुरू केले. आज हे हॉस्पिटल उत्तर महाराष्ट्रातील अनेक गरजूंसाठी आरोग्य मंदिर ठरले आहे. अलौकिक कार्याचा पाया घालणार्‍या भाऊसाहेब थोरात यांचे विचार हे कायम प्रेरणास्त्रोत राहिले आहे. त्यांच्याच विचारावर संगमनेरमधील सर्व कार्यकर्ते सदैव काम करत आहेत आणि हाच सेवाभावी विचार देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरला असल्याचे आमदार डॉ. तांबे म्हणाले.

यावेळी आर. बी. रहाणे, अ‍ॅड. नानासाहेब शिंदे, संपत गोडगे, संतोष मांडेकर, मीनानाथ वर्पे, रोहिदास पवार, प्राचार्य केशव जाधव, प्रा. बाबा खरात, विलास कवडे, सुभाष सांगळे, सुहास आहेर, राजेंद्र कडलग, चंद्रकांत कडलग, विलास वर्पे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. सुजित खिलारी, सचिव किरण कानवडे, अनिल थोरात, बापूसाहेब गिरी आदिंसह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Visits: 104 Today: 2 Total: 1105621

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *