हातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उडाला सुविधांचा बोजवारा

हातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उडाला सुविधांचा बोजवारा
नायक वृत्तसेवा, शेवगाव
तालुक्यातील हातगाव पंचक्रोशीसाठी काही महिन्यांपूर्वी मोठ्या थाटात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. परंतु सध्या हे रुग्णालय ‘असून अडचण नसून खोळंबा’ ठरत आहे. यामुळे ऐन कोरोना संकटात नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहत असल्याचे दुर्देवी चित्र दिसत आहे.


याबाबत नुकतेच शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना समस्त हातगाव ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये म्हंटले आहे की, हातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामधील आरोग्य अधिकारी हे कधीही वेळेवर येत नाहीत, कुठली आरोग्य सेवाही जबाबदारीने देत नाहीत. त्यांच्या विरुद्ध वरिष्ठांकडे काही तक्रार केल्यास तुमच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करू व तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी देतात. सध्या कोरोना महामारीचे भयावह संकट असूनही आरोग्य सुविधेचा बोजवारा उडालेला दिसत आहे. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेऊन येथील आरोग्य केंद्रात सर्व सेवा मिळाव्यात आणि आरोग्य अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या बायोमेट्रीक उपस्थिती मशीन बसवावे अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ग्रामस्थ आणि प्रहार जनशक्ती पक्ष 30 ऑक्टोबला हातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर आमरण उपोषणास बसतील असा इशारा प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप बामदळे, संजय पवार, बद्री बर्गे, किरण परदेशी, आजिनाथ देवढे आदिंनी दिला आहे.

Visits: 291 Today: 1 Total: 2055981

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *