कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नेवासा येथे तपासणी शिबीर
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नेवासा येथे तपासणी शिबीर
दिवसभरात तीनशे रुग्णांची तपासणी, औषधांचे वाटप
नायक वृत्तसेवा, नेवासा
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नेवासा येथे सर्वधर्मीय बांधवांसाठी मंगळवारी (ता.18) आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात दिवसभरात तीनशे रुग्णांची तपासणी करण्यात येऊन मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. सत्य मालिक लोकसेवा ग्रुप मालेगाव व राहत हेल्पिंग फाऊंडेशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने व मुस्लीम समाज बांधवांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या हस्ते तर जनसेवक सतीश पिंपळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी, नगरसेवक सुनील वाघ, ज्येष्ठ मार्गदर्शक जुम्माखान पठाण, नगरसेवक फारूक आत्तार, बहुजन समाजभूषण संजय सुखधान, जातीय सलोखा समितीचे सदस्य असीफ पठाण, ऑल इंडिया ऊलेमा बोर्डचे प्रदेशाध्यक्ष जाकीर शेख, ज्येष्ठ कार्यकर्ते गफूर बागवान, रहेमान पिंजारी, नगरसेवक राजेंद्र मापारी, शफीक जटाली, मुक्तार शेख, अब्बास बागवान, इमरान दारूवाले, पप्पीभाई शेख, इलियास पठाण, रशिद पुनतगाववाले, सुलेमान मणियार, शफी शेख, पटेल सर, हाफिज इमरान, हाफिज अरमान, फरदीनखान पठाण, टी.आर.पठाण आदी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या शिबिरात डॉ.नावेद अली, डॉ.उस्मान गणी, डॉ.मोहंमद राहिल, डॉ.मूतीयू रहेमान, डॉ.लियाकत सय्यद यांनी तपासणी करून योगदान दिले. या शिबीर प्रसंगी विक्रीसाठी मालेगाव आयुर्वेदिक काढाची पाकिटे ठेवण्यात आली होती. दुपारपर्यंत हे शिबीर सुरक्षित अंतराचे पालन करत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
