कोपरगावातील हॉटेल व बियरबार नियम धाब्यावर बसवून जोमात सुरू!
कोपरगावातील हॉटेल व बियरबार नियम धाब्यावर बसवून जोमात सुरू!
नियम सर्वसामान्यांसाठीच का?, शहरवासियांचा प्रशासनाला संतप्त सवाल
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरात कोरोना संसर्ग वाढत असून दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. कोपरगाव तालुक्यातील एकूणरुग्णसंख्या 17 व्या शतकाच्या पार गेली असून ही चिंताजनक बाब आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे 31 रुग्णांनी आपला प्राण गमवला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. परंतु, कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी कडक नियम लागू केले आहेत. त्याची अंमलबजावणीही सुरू आहे. नियमानुसार सायंकाळी 7 वाजेनंतर दुकाने खुली ठेवणार्यांवर प्रशासन दंडात्मक किंवा गुन्हे दाखल करण्याची कारवाई करत आहेत. मात्र, शहरातील काही हॉटेल व बियरबार चालक प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवताना दिसत आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. मग अशा परिस्थितीत नियम हे फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्हाधिकार्यांनी शहरातील दुकाने सुरू ठेवण्यासाठी एक ठराविक वेळ दिलेली आहे. सर्वच व्यापारी त्या नियमांचे पालन करत आहेत. जे दुकानदार नियमांचे उल्लंघन करत आहे, त्यांच्यावर पालिका कारवाई करत आहे. दरम्यान, कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आस्थापने खुले ठेवण्याची परवानगी दिली आहे. या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर प्रशासन दंडात्मक किंवा गुन्हे दाखल करण्याची कारवाई करत आहे. परंतु शहरातील काही हॉटेल व बियरबार चालक प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत हॉटेल, बार सुरू ठेवताना दिसत आहे. त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाल्याचे दिसत नाही. मग अशा परिस्थितीत नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
एकीकडे प्रशासन अहोरात्र कोरोनाच्या भयानक परिस्थितीमध्ये आपला जीव धोक्यात घालून कोरोना साखळी तोडण्यासाठी मेहनत घेत आहे. परंतु अशा काही हॉटेल चालकांच्या मनमानी कारभारामुळे खरचं कोरोनाची साखळी तुटेल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांवर कोरोनाच्या नावाखाली कायद्याचा बडगा उगारला जात असताना दुसरीकडे हॉटेल राजरोसपणे रात्री उशिरापर्यंत सुरू आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून पोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक करून सुरू आहेत की त्यांच्या आशीर्वादाने? याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या या दुजाभावाबद्दल नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया देखील उमटत आहे.
मास्क अथवा रुमाल न वापरणार्या नागरिकांवर कारवाई होताना दिसत आहे. परंतु सामान्य नागरिकांनी पाणी पिण्यासाठी मास्क खाली केले. तरी देखील पोलिसांकडून कोणतीही शहानिशा न करता गुन्हा दाखल केला जात आहे. पोलीस प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांवर दहशत बसवली आहे. तर दुसरीकडे अवैध धंदे तेजीत चालू आहेत. याबद्दल मात्र शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते दहशतीपोटी बोलण्यास तयार नाहीत. जो कोणी बोलायला जाईल त्याच्यावर पोलिसांकडून दबाव टाकला जात असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. कायदा हा सगळ्यांना सारखा आहे की सर्व सामान्य नागरिकांना वेगळा आहे असा प्रश्नही ते विचारत आहे.
कोपरगाव पालिकेचे एक कर्मचारी शहरातील सावरकर चौकात सुदेश टॉकीजजवळ रात्री पावणे आठ वाजेपर्यंत दुकानदाराला थांबवून खरेदी करत होते. यातून सामान्य नागरिकांना एक नियम आणि प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्यांना वेगळा नियम असे दिसून येत आहे. त्यामुळे कायद्याचे खरे रक्षक कोण? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.