संगमनेरात शिवसेनेचे किरीट सोमय्यांविरोधात तीव्र आंदोलन ‘आयएनएस विक्रांत’ अपहार प्रकरण; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीय नौदलातील महत्वाची समजली जाणारी ‘आयएनएस विक्रांत’ ही युद्धनौका वाचवण्यासाठी कोट्यावधी रुपयांची लोकवर्गणी जमवून सुमारे 56 करोड रुपयांचा अपहार केल्याबद्दल भाजप प्रवक्ते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्यावतीने संगमनेरात सोमय्या यांच्या निषेधार्थ बसस्थानकासमोर नाशिक-पुणे महामार्गावर आंदोलन करण्यात आले.
केंद्रीय सत्तेचा गैरवापर करत सोमय्या आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हे स्वतःला ईडीचे प्रवक्ते समजायला लागले आहेत, रोज विरोधी नेत्यांवर बेछूट आरोप करणे आणि केंद्र सरकारच्या दबावाखाली केंद्रीय यंत्रणांना कारवाई करायला भाग पाडणे हा आता भाजपाचा धंदाच झाला आहे. देशाची संपत्ती असलेल्या विक्रांत युद्ध नौकेच्या नावाखाली वर्गणी गोळा करून ते पैसे स्वतःच लाटून भ्रष्टाचार केलेल्या सोमय्याला इतरांवर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाहीच. शिवाय अशा देशद्रोही माणसावर त्वरीत गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई देखील व्हावी असे मत शहरप्रमुख अमर कतारी यांनी व्यक्त केले. किरीट सोमय्याने देशद्रोह केला असून शिवसेना व ठाकरे परिवाराविषयी बोलण्याचा त्यांना कोणताही अधिकार नसून प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन सोमय्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा भावना शहरप्रमुख प्रसाद पवार यांनी व्यक्त केल्या.
एकंदरीतच सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात जिथे दिसेल तिथे सोमय्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहेत असे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी वृत्तपत्र प्रतिनिधींसोबत बोलताना सांगितले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी व शहरप्रमुख प्रसाद पवार यांनी केले. समवेत उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, अकोले-संगमनेर समन्वयक आप्पा केसेकर, माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार, रावसाहेब गुंजाळ, महिला आघाडी तालुकाप्रमुख शीतल हासे, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, विकास डमाळे, अपंग सेना जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे, इम्तियाज शेख, दीपक वनम, सुदर्शन इटप, नागपूर संपर्कप्रमुख नरेश माळवे, संजय फड, योगेश बिचकर, पप्पू कानकाटे, अमोल कवडे, प्रथमेश बेल्हेकर, सागर भागवत, विजय शिंदे, विजय भागवत, सचिन पावबाके, दिनेश फटांगरे, वेणूगोपाल लाहोटी, राजाभाऊ सातपुते, त्रिलोक कतारी, प्रशांत खजुरे, अनिल खुळे, भीमा पावसे, गुलाब भोसले, वैभव अभंग, फैसल सय्यद, अजीज मोमीन, शरद पावबाके, संकेत कोल्हे, संतोष कुटे, गोविंद नागरे, रवी गिरी, मुकेश काठे, नीलेश गुंजाळ, अक्षय गाडे, ब्रम्हा खिडके, संभव लोढा, भावड्या चव्हाण, जयदेव यादव आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.