वीरगावचे हनुमान मंदिर पर्यटनस्थळ बनविणार : वाकचौरे पंधरा लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

नायक वृत्तसेवा, अकोले
अहमदनगर जिल्हा नियोजन मंडळाच्या ‘क’ वर्ग दर्जाचे वीरगावचा हनुमान मंदिर परिसर पर्यटनस्थळ बनविण्याचा मानस जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी व्यक्त केला.
अकोले तालुक्यातील वीरगावच्या हनुमान मंदिराच्या परिसर सुशोभीकरण कामाचा रविवारी (ता.20) शुभारंभ करताना ते बोलत होते. तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत मंदिर परिसरातील संरक्षक भिंत 10 लाख रुपये आणि परिसर सुशोभिकरणांतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी 5 लाख रुपये खर्च होणार आहेत. जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांचे विकास निधीतून ही कामे होणार आहेत.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, कोणतेही तीर्थक्षेत्र माणसाला आत्मिक आनंदाची अनुभूती देते. निराशाजनक विचारांना याठिकाणी पूर्णविराम मिळतो. अकोले तालुक्यातीलच नाही तर दूरवरुन देखील भाविक भक्त या परिसराला भेटी देतील असा नयनरम्य परिसर याठिकाणी उभा करण्यात येईल. अजूनही अनेक विकासकामे या परिसरात करुन पर्यावरणीय सौंदर्य याठिकाणी निर्माण करु असा शब्द वाकचौरे यांनी वीरगाव ग्रामस्थांना दिला.

यावेळी वाल्मिक देशमुख, अंकुश थोरात, प्रकाश वाकचौरे, ज्ञानेश्वर वाकचौरे, महेश वाकचौरे, गणेश वाकचौरे, नामदेव कुमकर, आबासाहेब थोरात, नीलेश वाकचौरे, रेवण देशमुख, सुनील वाकचौरे, ह.भ.प. रामनाथ महाराज अस्वले, विलास नजान, नानासाहेब मालुंजकर, संपत वाकचौरे, भाऊसाहेब अस्वले, निवृत्ती कुमकर, बाळासाहेब वाकचौरे, एकनाथ नजान, बाजीराव अस्वले, विजय वर्पे, राहुल वाकचौरे, काशिनाथ वाकचौरे, दत्तात्रय वाकचौरे, लक्ष्मण नजान, संदीप अस्वले, नामदेव वाघ, रामनाथ टेमगिरे, पत्रकार ज्ञानेश्वर खुळे यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वीरगावचे हनुमान मंदिर सुशोभिकरणामुळे भाविकांच्या चेहर्यावरचे समाधान हाच खरा आनंददायी क्षण असेल. अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयानेच आदर्श नागरिक उभा राहील. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा आणि स्पर्धा परीक्षांची त्यांची आवड वाढावी म्हणूनही भविष्यात भरीव कार्य करण्यास मी प्रयत्नशील राहील.
– जालिंदर वाकचौरे (जिल्हा परिषद सदस्य, अहमदनगर)
