सामूहिक जबाबदारीतूनच आंबी-माळेगाव सोसायटीची देखणी इमारत ः थोरात आंबीखालसा येथे विविध कामांचे उद्घाटन; मान्यवरांची मोठी उपस्थिती

नायक वृत्तसेवा, घारगाव
आंबी व माळेगाव या दोन्ही गावांनी कायमच सामूहिक पद्धतीने जबाबदारी पार पाडल्यामुळे आपल्याला आज ही सोसायटीची भव्य दिव्य इमारत दिसत असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा येथे उपबाजार समिती, गणपीरदरा धरण जलपूजन, डिजिटल बोर्ड अनावरण, शाळा खोल्यांचे भूमिपूजन व नवीन इमारतीचे अनावरण अशा विविध विकासकामांचे उद्घाटन संपन्न झाले. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत आमदार डॉ. किरण लहामटे, डॉ. सुधीर तांबे, शेतकरी विकास मंडाळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, जिल्हा बँकेच उपाध्यक्ष माधव कानवडे, बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, लक्ष्मी ट्रेडींग कंपनीचे संचालक दत्तात्रय गडगे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना नामदार थोरात म्हणाले, आंबीखालसा ग्रामस्थांनी खूप सुंदर कार्यक्रम केला आहे. चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाने तसेच आंबी-माळेगाव ग्रामस्थांनी एकत्र येत भव्य दिव्य असे इमारतीचे काम केले आहे. स्व. नाथाबाबा शेळके व स्व. प्रभाकरराव भोर या दोन्ही माणसांकडे दूरदृष्टी होती. त्यामुळे ते भविष्य काळाकडे दूरदृष्टीने पाहत होती म्हणून आज पठारभागात अनेक आदर्श गावे पहावयास मिळत आहे म्हणूनच आज त्यांची आठवण येणे साहजिकच आहे. त्याचप्रमाणे तुम्ही ग्रामस्थांनी उपबाजार समितीस जी जागा दिली आहे त्याचा नक्कीच या भागातील सर्वसामान्य शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. या भागातील पुढची पिढी सशक्त बनण्यासाठी त्यांना खेळाची गरज असते. त्यामुळे तुम्ही येथे खेळाच्या मैदानासाठी जागा द्यावी त्याचा फायदा पठारभागातील मुलांसाठी होईल. पुढे जावून नामदार थोरात म्हणाले, अजय फटांगरे हा युवक काँग्रेस पासून असा वावरेला आहे की साधा गरीबाचा पोरगा हा कार्यकर्ता झाला आहे तो सतत धावपळ, प्रयत्न, काम खूप चांगल्या पद्धतीने करत आहे. त्यामुळे त्याने सभापतीपदाचा उपयोग तालुका व जिल्ह्याकरीता केला आहे.

आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले, एखाद्या आमदारालाही लाजवेल असे काम खर्‍या अर्थाने अजय फटांगरे यांनी पठारभागात केले आहे त्याचबरोबर त्यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा आहे. माझ्या विधानसभेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व अजय फटांगरे यांचा सिंहाचा वाटा आहे. मला निवडणूक लढताना पठारभागात बिलकुल त्रास झाला नाही. आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले राज्यात एकामागून संकटांची मालिका सुरू आहे. मात्र अशा कठीण काळात आघाडी सरकारने माघार घेतली नसून हे आघाडी सरकार खर्‍या अर्थाने सर्वसामान्य लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचे शेवटी डॉ. तांबे यांनी सांगितले. सूत्रसंचालन नानासाहेब भोर यांनी केले. प्रास्ताविक चेअरमन गोकुळ कहाणे यांनी तर आभार आशोक गाडेकर यांनी मानले. यावेळी अ‍ॅड.सुहास आहेर, सरपंच बाबासाहेब ढोले, दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन सुभाष आहेर, रमेश आहेर, बबन कुर्‍हाडे, व्हाईस चेअरमन सोपान भोर, सुनंदा भागवत, भाग्यश्री नरवडे, तुळशीनाथ भोर, सर्जेराव ढमढेरे, सुरेश कान्होरे, उपसरपंच रशीद सय्यद, सुरेश गाडेकर, दत्तात्रय कान्होरे, सरपंच अरुण वाघ, संपत आभाळे, शिवाजी तळेकर, गणेश सुपेकर, विकास शेळके, बाळासाहेब कुर्‍हाडे, यशवंत शेळके, दत्तात्रय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Visits: 10 Today: 1 Total: 79634

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *