शेतीच्या वादातून सहा जणांवर गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील निमज येथे शेताच्या बांधावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी होवून खुनाचा प्रयत्न झाल्याचा प्रकार जानेवारी महिन्यात घडला होता. त्यानंतर विरोधी गटातील सहा जणांनी जखमींना भेटण्यास आलेल्यांना शिवीगाळ व मारहाण करुन गंभीर दुखापत केली. या प्रकरणी तालुका पोलिसांत सहा जणांविरोधात विविध कलमान्वये गुरुवारी (ता.30) गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निमज येथील फिर्यादी शकुंतला बाच्छव कासार यांच्या शेतालगत पोपट चिमाजी कासार व मंदा पोपट कासार यांची जमीन आहे. बांध फोडण्याच्या कारणातून वाद होवून फिर्यादीचा मुलगा विलास यास तारेच्या कंपाऊंडमध्ये अडकवून मारहाण केली. तसेच गळा आवळून खुनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जखमींना भेटण्यास आलेल्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तर दीपक दिघे यांच्या डोक्यात कुर्हाडीचा वार करण्याचा प्रयत्न केला. याबाबत न्यायालयात दिलेल्या तक्रारीवरुन पोपट चिमाजी कासार, मंदा पोपट कासार, गोकुळ भाऊसाहेब कासार, गणेश भाऊसाहेब कासार, मंदा भाऊसाहेब कासार, संतोष दामोधर जाधव यांच्याविरोधात गुरनं.424/2021 भादंवि कलम 307, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
