पवनकुमार वर्मा व स्वाती शाह यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष पवनकुमार वर्मा व सुमेरू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा स्वाती शाह यांना मानव विकास संस्थेचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार 2021 जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मानव विकास संस्था लातूरचे संस्थापक वसंत घोगरे यांनी दिली आहे.

सदर पुरस्काराचे वितरण लवकरच लातूर येथील दयानंद सभागृहात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व पद्मश्री डॉ. सिंधूताई सपकाळ, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात समाजप्रबोधनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रोटरीचे अध्यक्ष पवनकुमार वर्मा हे द्वारका ज्वेलर्सचे संचालक असून सामाजिक कार्यकर्ते आहेत. सुमेरू एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा स्वाती शाह ह्या श्री श्री रवीशंकर विद्यालयाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. नाशिक येथील स्त्री उद्यमी फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरण व उद्योजक निर्माण करण्यासाठी योगदान दिले आहे. तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात योग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. स्वाती शाह या निर्मिती पतसंस्थेच्या संचालिका असून संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे 1800 बचत गट स्थापन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम केले आहे. पवनकुमार वर्मा व स्वाती शाह यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Visits: 219 Today: 1 Total: 2167646

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *