ट्रेंड्स सेल्फी स्पर्धेद्वारे साजरा करा गणेशोत्सव!

नायक वृत्तसेवा, नगर
रिलायन्स रिटेलची भारताची सर्वात मोठी आणि सर्वात वेगानं वृद्धिंगत होणारी अ‍ॅपारेल आणि अ‍ॅक्सेसरीज स्पेशियल्टी श्रृंखला, ट्रेंड्स, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या ग्राहकांसोबत आपले संबंध बळकट करीत आहे. ट्रेंड्सने महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, ओडिशामधील आपली उपस्थिती आणि व्याप्तीद्वारे आपल्या ग्राहकांसाठी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने एक रोचक स्पर्था आयोजित केली आहे. ट्रेंड्स गणेश मूर्तींसोबत सेल्फी स्पर्था नावाच्या रोचक स्पर्धेद्वारे यंदाच्या पवित्र गणेश चतुर्थी उत्सवात संपर्क साधत आहे. ही अत्यावश्यकतेने एक स्पर्धा आहे ज्यामध्ये ट्रेंड्स आपल्या ग्राहकांकडून प्रवेशिका आमंत्रित करत आहे.

ग्राहकांनी आपल्या घरातील गणेश मूर्तीच्या सजावटीसोबत स्वताःची एक सेल्फी किंवा फोटो घ्यायचा आहे. सर्वोत्तम सजावट केलेली गणेश मूर्ती ठरणारी सेल्फी/फोटो याला पहिले बक्षीस 1500 रुपये किंमतीची भेटवस्तू देण्यात येईल. इतकेच नव्हे, प्रत्येक सहभागीला एक ट्रेंड्स डिस्काऊंट कूपन मिळेल जे नजिकच्या ट्रेंड्स स्मॉल टाऊन स्टोअरमध्ये घेता येईल. ही स्पर्धा 21 सप्टेंबर, 2021 रोजी समाप्त होणार आहे. या स्पर्धेबाबत व्हाट्सअ‍ॅप कॅटलॉग, एसएमएस आणि ट्रेंड्स माहितीपत्रकांद्वारे केली जाईल जी घरोघरी वितरणाद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवली जातील. संबंधित शहरांमधील एक नामवंत कला शिक्षक, प्रवेशिकांचे परीक्षण करतील. संबंधित शहरांच्या पहिल्या बक्षीस विजेत्याला ट्रेंड्स स्मॉल टाऊन स्टोअरमध्ये आमंत्रित केले जाईल आणि 1500 रुपये किंमतीचे पहिले बक्षीस त्याला एखादी नामवंत महिला डॉक्टर किंवा पालिका/पोलिस विभागातील एक वरीष्ठ महिला अधिकार्‍याच्या हस्ते देण्यात येणार आहे.

Visits: 119 Today: 2 Total: 1098919

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *