संगमनेर पालिकेकडून क्रीडा संकुलात लसीकरण केंद्र सुरू

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णवाढ थांबविण्यासाठी प्रशासन व पदाधिकारी विविध उपाययोजना करत आहेत. मात्र संपूर्ण शहर कोरोना मुक्त करण्यासाठी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या पुढाकारातून शहरातील नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे संगमनेर नगरपरिषदेच्यावतीने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्राचा शुभारंभ नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते झाला. यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, नगरसेवक गजेंद्र अभंग, नितीन अभंग, किशोर टोकसे, राजेंद्र वाकचौरे, कुंदन लहामगे, किशोर पवार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप आदी उपस्थित होते. या लसीकरण केंद्रांमध्ये 45 वर्षांच्या पुढील नागरिकांचे लसीकरण हे लसी जशा उपलब्ध होतील तसे करण्यात येणार आहे. नागरिकांनी गर्दी करू नये. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी. ज्यांना फोन येईल व त्यांनीच लसीकरण केंद्रावर यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Visits: 150 Today: 1 Total: 2058643

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *