शिर्डीमध्ये गॅस टाकीचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली

नायक वृत्तसेवा, शिर्डी
येथील श्रीरामनगर भागातील अत्यंत गर्दळीच्या लोकवस्तीजवळ पाच पैकी एका चायनीय हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट झाला. यावेळी पत्र्याच्या छताचे व साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवतानाच पाच पैकी चार गॅस टाक्या सुरक्षित काढण्यात यश आल्याने मोठी जीवितहानी टळली. ही घटना 26 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

शिर्डीतील श्रीरामनगर भागात कोते गल्लीजवळ कोलकाता येथील गौर मंडल व चुलता सुखदेव मंडल हे चायनिजचा कच्चा माल तयार करतात. 26 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास कच्चा माल तयार करण्याचे काम चालू होते. गौर मंडल या दरम्यान लघुशंकेसाठी गेला. त्याचवेळी गॅस शेगडी व सिलेंडरने पेट घेतला. क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्याने टाकीच्या अक्षरशः ठिकर्‍या ठिकर्‍या झाल्या. या स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांसह नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते पोपट शिंदे, लुकेश शिंदे यांनी धाव घेतली. तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला आणि लुकेश शिंदे यांनी उर्वरित चार गॅस टाक्या काढण्यासाठी प्रयत्न केला. तोपर्यंत शिर्डी नगरपंचायतचे बंब घटनास्थळी दाखल झाले. विलास लासुरे व त्यांच्या सहकार्‍यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. शिर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

Visits: 48 Today: 1 Total: 433060

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *