रेखा जरे हत्याकांड; बोठेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

नायक वृत्तसेवा, नगर
यशस्विनी महीला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज आज (बुधवार ता.16) जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

रेखा जरे हत्याकांड प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अहमदनगर शहरातून पसार झालेल्या बोठे याने जिल्हा न्यायालयात अ‍ॅड.महेश तवले यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी 7 डिसेंबर रोजी अर्ज केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एम.नातू यांच्यासमारे या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड.सतीश पाटील यांनी युक्तीवाद करत बोठे याच्या विरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे असल्याने त्याला अटकपूर्व जामीन देऊ नये, अशी मागणी केली होती. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता. बुधवारी न्यायालयाने निर्णय देत बोठे याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने बोठे याला जामिनासाठी खंडपीठात धाव घ्यावी लागणार आहे.

Visits: 78 Today: 1 Total: 1113495

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *