ब्राह्मण समाजाने हिंदुत्वासाठी एकत्र असणं आवश्यक : दवे
ब्राह्मण समाजाने हिंदुत्वासाठी एकत्र असणं आवश्यक : दवे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे उत्तर महाराष्ट्र दौर्यावर असताना रविवारी (ता.23) त्यांनी संगमनेर येथील संत ज्ञानेश्वर मंदिर येथे शहरातील ब्राह्मण समाजाच्या प्रमुख पदाधिकारी, संस्था प्रतिनिधी यांच्या बरोबर भेटी घेऊन संवाद साधला. यावेळेस ब्राह्मण समाजाने आजपर्यंत देशासाठी आणि धर्मासाठी केलेल्या त्याग आणि परिश्रमांना उजाळा देऊन आजही त्याचीच गरज असल्याचे दवे यांनी सांगितले.

पुणे येथील बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याजवळ जिना तयार करण्याचे कार्य हाती घेतल्याचे ब्राह्मण महासंघाकडून जाहीर झाले आहे. त्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. यावेळेस पुरोहित संघाच्यावतीने या कार्यास 5 हजार रुपयांची तर श्री.सराफ यांनी 1500 रुपयांची मदत जाहीर केली. तर डॉ.माळी यांनी आपल्या पतसंस्थेच्या कार्याची माहिती सर्व पदाधिकार्यांना दिली. दवे यांच्यासह विश्वस्त मनोज तारे, तुषार निंबर्गी, श्रीपाद कुलकर्णी उपस्थित होते. तर संगमनेर येथील पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी, उपाध्यक्ष संदीप वैद्य, अरुण कुलकर्णी, प्रतीक जोशी, सागर काळे, विजय नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष विशाल जाखडी, ब्राह्मण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सुधाकर क्षीरसागर, सचिव उमेश देशपांडे, विजय नागरी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष डॉ.आशुतोष माळी, सामाजिक कार्यकर्ते गिरीश देशपांडे, राजेंद्र क्षीरसागर, प्रा.सतीश देशपांडे, हत्तीछाप उद्योग समूहाचे ज्येष्ठ संचालक रमेश सराफ, ज्येष्ठ नागरिक संघाचे नंदकुमार बेल्हेकर, सुहास देशपांडे, बापू दाणी, नीलेश पुराणिक, ब्राम्हण महिला व्यवसाय महासंघाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा विद्या क्षीरसागर, नीलेश सुतवने, विनोद सुतवने आदी उपस्थित होते.

