‘राजपाल’मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

‘राजपाल’मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील कापड व्यवसायात अग्रेसर असणार्‍या राजपाल क्लॉथ स्टोअर्स दालनात 74 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दोनशे ग्राहकांना भारतीय नकाशाची प्रतिमा असलेल्या बॅचचे वाटप करण्यात आले. तसेच संपूर्ण दालनात तिरंग्याची थीम घेऊन कपड्यांची मांडणी करण्यात आली होती. तर कर्मचार्‍यांनी देखील तिरंगी रंगाचा पोशाख परिधान केला होता. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास देशासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करुन ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी सर्व संचालक, कर्मचारी, ग्राहक यांनी राष्ट्रगीत गायले. राजपाल उद्योग समूहाच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं ग्राहकांनी कौतुक केलं. शेवटी संचालिका सरलादेवी राजपाल यांनी स्वातंत्र्य दिनाच्या असंख्य ग्राहक आणि हितचिंतकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालक सोनू राजपाल, कैलास मेहेत्रे, श्यामल, महावीर, शुभांगी जाधव, रेणुका मोरे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

Visits: 195 Today: 1 Total: 2058634

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *