वाचन प्रेरणा दिनाची स्फूर्ती घेऊन जीवन समृद्ध करावे ः आभाळे
वाचन प्रेरणा दिनाची स्फूर्ती घेऊन जीवन समृद्ध करावे ः आभाळे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जीवनासाठी प्रेरणा आवश्यक असते. प्रत्येकाचं जीवन समस्या व संघर्षानं भरलेलं असतं. संघर्षातून समृद्धी येते आणि अशी समृद्धी येण्यासाठी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जीवनगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. 15 ऑक्टोबरला असणार्या वाचन प्रेरणा दिनापासून आपण स्फूर्ती घेऊन जीवन बहुअंगाने समृद्ध करून यशस्वी व्हावे असे विचार अक्षरभारती (पुणे)चे अध्यक्ष भानुदास आभाळे यांनी व्यक्त केले.
संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयाच्या ऑनलाईन वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुभाष गडगे हे होते. व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक सुभाष वारुंक्षे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय संजय शिंदे यांनी करून दिला. हातांच्या स्वच्छतेविषयी शास्त्रीय व मौलिक माहिती शशांक खोजे यांनी दिली. आभार प्रदर्शन वसंत डांगळे यांनी केले. याप्रसंगी सर्व शिक्षक, सेवकवृंद उपस्थित होते. तर अनेक पालक ऑनलाईन उपस्थित होते.
‘बीज अंकुरे-अंकुरे’मध्ये बंगाली लघुकथा…
श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी कथा, लघुकथा, कविता, निबंध व प्रसंग लेखन करत साहित्याची निर्मिती केली. स्वानुभवाचे लेखन करत सृजनशीलता जोपासली. साहित्य निर्मितीसाठी ग्रंथालय विभागाचे समन्वयक बाळासाहेब पिंगळे, वसंत बोडखे व सखाराम पटांगरे यानी ग्रंथालय व लघुकथा कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर सुमित विश्वास या विद्यार्थ्याने बंगाली भाषेतून ‘अंधविश्वास’ ही लघुकथा पालकांच्या सहकार्यातून सादर केली. श्रद्धा पेठकर हिने माझे गुलाब, श्रेया शिंदे हिने पेड का अनोखा रिश्ता, तसेच कल्याणी कडनर, निकीता फड, आरती सानप, अनिकेत चत्तर, समृद्धी वारुंक्षे, आदिती चत्तर, प्रमोद चत्तर, आदित्य वाकचौरे, कीर्ती परदेशी, प्रतीक्षा चत्तर, ऋतुजा वारुंक्षे, श्रृतिका गायकवाड, ओम नवले, सिद्धी फुलसुंदर, समीक्षा कोटकर व सलोनी चत्तर या विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता प्रस्तुत केल्या. यावेळी अग्निपंख चरित्रातील उतार्याचे वाचन करण्यात आले.