बाभळेश्वर येथील हॉटेल साईप्रसादमध्ये वेश्या व्यवसाय पोलिसांनी धाड टाकून परप्रांतीय तरुणीची केली सुटका


नायक वृत्तसेवा, शिर्डी
हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून वेश्या व्यवसाय करून घेणार्‍या हॉटेल साईप्रसादवर धाड टाकून पोलिसांनी एका परप्रांतीय तरुणीची सुटका केली आहे. तसेच एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई शिर्डी जवळील बाभळेश्वर येथील हॉटेल साईप्रसादवर बुधवारी (ता.६) संध्याकाळी करण्यात आली. सदरच्या कारवाईने अवैध धंदे करणार्‍या हॉटेल चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना माहिती मिळाली की हॉटेल साईप्रसाद येथे परप्रांतीय तरुणीकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे. सदर माहितीच्या आधारे मिटके यांच्या पथकाने सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकत एका पीडित परप्रांतीय तरुणीची सुटका केली. तसेच दीपक उर्फ बंटी बाबासाहेब थोरात (रा. कोल्हार बुद्रुक, ता. राहाता) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीविरुद्ध लोणी पोलिसांत अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

या कारवाईमुळे बाभळेश्वर परिसरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक यूवराज आठरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, हेडकॉन्स्टेबल इरफान शेख, अशोक शिंदे, कृष्णा कुर्‍हे, श्याम जाधव, कॉन्स्टेबल दिनेश कांबळे, महिला पोलीस नागरे, चालक नर्‍हे, अप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे.

Visits: 202 Today: 1 Total: 1422826

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *