पिंपळदरीचा आदिवासी तरुण बनला कृषी मंडळ अधिकारी भैरवनाथ विद्यालय, चास ग्रामपंचायतसह ग्रामस्थांनी केला सत्कार


नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील आदिवासीबहुल पिंपळदरी येथील आदिवासी तरुण सुनील संजय कडाळे याने अपार मेहनत, जिद्द आणि अनेक अडथळ्यांना पार करत कृषी मंडळ अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे पिंपळदरी-चास गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सुनीलच्या यशाबद्दल चास ग्रामपंचायत, ग्रामस्थ, भैरवनाथ विद्यालय, जिल्हा परिषद शाळा यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य भागवत वाडेकर होते. उपसरपंच सचिन शेळके, भैरवनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सुनील चौधरी, सुनीलचे आजोबा बजरंग कडाळे, वडील संजय कडाळे, भाऊ अजय कडाळे, सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंदे, संपत पवार, गणेश शेळके, निवृत्ती पवार, प्राथमिक शिक्षक विजय दुरगुडे, भास्कर तुरनर, रोटरी क्लब अकोलेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अमोल वैद्य, प्रा. संदीप नवले, प्रा. शिवाजी खुळे, प्रा. मनीषा शेटे, रोहिदास शेळके, भारत शेळके, आर. के. दुरगुडे, सुदर्शन आळणे, रामनाथ शेळके, पंढरीनाथ मेंगाळ आदिंसह ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपसरपंच सचिन शेळके यांनी गरीब कुटुंबातील मुलगा स्पर्धा परीक्षेतून एवढ्या मोठ्या पदावर जाऊ शकतो ही आपल्या गावासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे तरुणांनी ही गोष्ट लक्षात घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी शालेय जीवनापासूनच करावी आणि आपले धेय्य निश्चित करावे असे आवाहन केले.

सत्कारमूर्ती नवनियुक्त कृषी मंडळ अधिकारी सुनील कडाळे याने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले, सात बाराचाचा अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच स्पर्धा परीक्षा पास झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले. अभ्यासाचे सात बाराचे सूत्र म्हणजे सकाळी ७ ते संध्याकाळी १२ वाजेपर्यंत कसून अभ्यास करणे असे सांगितले. या यशावरच न थांबता अभ्यास करुन वन अधिकारी बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रास्ताविक व स्वागत ज्येष्ठ भारत शेळके यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक शिवराम भोर यांनी करत शेवटी आभार मानले.

Visits: 16 Today: 1 Total: 114896

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *