माळेवाडी येथील अवैध दारुविक्री बंदीसाठी महिला आक्रमक जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांसह उत्पादन शुल्कला दिले निवेदन

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील माळेवाडी येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या देशी-विदेशी दारुची दुकाने त्वरीत बंद करावीत, अशी मागणी महिलांसह ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात महिलांनी श्रीरामपूर येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयाबाहेर दारूबंदी झालीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करत पोलीस अधीक्षक आणि उत्पादन शुल्क अधिकार्‍यांना निवेदन दिले.

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेसह माध्यमिक विद्यालय परिसराजवळ अनेक ठिकाणी अवैध दारू व्यवसाय जोमात सुरू आहेत. ठिकठिकाणी दारूचे व्यवसाय सुरू झाल्याने अनेक तरुण व्यसनाधिन होत आहेत. अनेकांचे कुटुंब दारुच्या व्यसनापायी उद्ध्वस्त झाले असून मजूर काम करणारे आपल्या कुटुंबासाठी खर्च न करता दारुसाठी पैसे खर्च करत असल्याने त्या कुटुंबियांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. दारुच्या व्यसनापायी अनेक तरुण घरी त्रास देत असून इतर अवैध व्यवसायाकडे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भविष्यातील ही तरुण पिढी व्यसनाधिन होण्यापूर्वीच दारुविक्री करणार्‍यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी महिलांसह ग्रामस्थांनी केली आहे.

या निवेदनावर सरपंच सोपान औताडे, रामभाऊ औताडे, रामभाऊ वमने, भरत वमने, कचरू औताडे, ग्रामपंचायत सदस्य मारुती मोहन, संभाजी गायकवाड, चंद्रशेखर वमने, संचालक दिलीप औताडे, सुरेश ढोबळे, बबन औताडे, नानासाहेब औताडे, गौतम मोहन, बाळासाहेब ढोबळे, शिवाजी तारडे, विष्णूपंत नेद्रे, रघुनाथ नेद्रे, आयुब शेख, शौकत सय्यद आदिंसह पोलीस पाटील उज्ज्वला जाधव, उपसरपंच दीपाली ढोबळे, माजी उपसरपंच अश्विनी वमने, श्रीरंग जाधव, भाऊसाहेब औताडे, मदन हाडके, माजी उपसरपंच अनिता वाघ, ग्रामपंचायत सदस्या कांताबाई उमाप, शीला नेद्रे, जयश्री औताडे, मालती मोहन, संगीता थोरात, मंदा नेद्रे, ज्योती वमने, नंदा वमने, लता झुराळे, अनिता औताडे, देवकाबाई बर्डे, शकुंतला ढोबळे, बेबी जाधव, शारदा काळे, छाया औताडे, मुमताज सय्यद, विमल वमने, विठाबाई गायकवाड, बबिता सोनवणे, कल्पना औताडे, मंगल नेद्रे, माया मोरे, वंदना मोदी, आशाबाई पवार, सुनीता मेटे, रुपाली औताडे, वच्छलाबाई उमाप, मंदा उमाप, आशा गोरे, सविता वैरागळ आदी महिलांसह शेकडो ग्रामस्थांची नावे आहेत.

Visits: 130 Today: 1 Total: 1418774

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *