दूध उत्पादकांना पशुखाद्याच्या महागाईतून मिळणार दिलासा! संगमनेरात वाजवी किंमतीत ‘ग्रीन गोल्ड’ पशुखाद्य विक्रीसाठी उपलब्ध
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या दूध उत्पादक शेतकरी महागाईमुळे अडचणीत आलेले आहे. परंतु, शेतकर्यांना आता कमी किंमतीत आणि अत्यंत दर्जेदार ‘ग्रीन गोल्ड’ पशुखाद्य मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. शुक्रवारी (ता.4) प्रातिनिधीक स्वरुपात कोकणगाव (ता.संगमनेर) निझर्णेश्वर दूध उत्पादक संस्थेत विक्रीस प्रारंभ झाला.
गेल्या दोन वर्षांपासून कोविडचे संकट सुरू आहे. त्यातच निसर्गाची अवकृपा होत असल्याने शेतकरी वारंवार संकटात सापडत आहे. दुग्ध व्यवसायासाठी चारा आणि खाद्य हे प्रमुख घटक असून, दिवसेंदिवस महाग होत आहे. यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळावा म्हणून पडतानी इंडस्ट्रीजने 18 प्रकारची खनिजे, वनस्पती, धान्य, प्रथिने व व्हिटॅमिनयुक्त ‘ग्रीन गोल्ड’ पशु आहार अगदी वाजवी किंमतीत 50 किलोच्या बॅगेत उपलब्ध करुन दिला आहे. यामुळे फॅट व दुधवाढीसाठी मोठा फायदा होणार आहे. संगमनेर शहरातील हॉटेल जोशी पॅलेसमागे हे पशुखाद्य शेतकर्यांना मिळणार आहे.
दरम्यान, निझर्णेश्वर दूध उत्पादक संस्थेत विक्री शुभारंभ झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष केशव शिंदे, उपाध्यक्ष विनायक जोंधळे, सभासद शिवाजी जोंधळे, किशोर जोंधळे, अशोक जोंधळे यांसह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. ‘गोसेवा हिच ईश्वर सेवा’ या अभियानांतर्गत पशुखाद्याच्या वाढलेल्या किंमतीतून शेतकर्यांना नक्कीच दिलासा मिळेल, असा आशावाद पडतानी इंडस्ट्रीजच्या संचालकांनी व्यक्त केला आहे.