महसूल मंत्री थोरातांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम रक्तदान, दिव्यांग शिबिर यांसह विविध स्पर्धांचे आयोजन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस हा संगमनेर तालुक्यात स्फूर्ती दिन म्हणून साजरा केला जात असून येत्या सोमवारी (ता.7) रक्तदान शिबिर, दिव्यांगांसाठी विविध कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांसह विविध रचनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महसूल मंत्री थोरात हे 1985 पासून संगमनेर तालुक्याचे विक्रमी मताधिक्याने प्रतिनिधीत्व करत आहेत. राज्य मंत्रिमंडळात कृषी, जलसंधारण, शालेय शिक्षण, रोहयो, महसूल, खार जमीन अशा विविध मंत्री पदांवर त्यांनी अत्यंत कार्यक्षमपणे काम करताना हे खाते लोकाभिमुख बनवले आहे. पस्तीस वर्षे अविश्रांत काम करताना जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व संगमनेर तालुका परिवार मानून सातत्याने काम करणारे नामदार थोरात संपूर्ण राज्यात लोकप्रिय आहेत.

काँग्रेसच्या वरीष्ठ नेतृत्वाचा नामदार थोरात यांच्यावर मोठा विश्वास असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद, काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे समितीचे कायमस्वरूपी सदस्य, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते अशा विविध महत्त्वपूर्ण जबाबदार्‍या त्यांनी निभावल्या आहेत. पक्षाचा मोठा विश्वास, शांत, संयमी स्वभाव, विविध क्षेत्रांची जाण, प्रत्येकाला नावानिशी हाक मारण्याची पद्धत, कामाचा पाठपुरावा आणि अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे युवकांमध्येही ते अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांचा वाढदिवस हा संगमनेर तालुक्यात व जिल्ह्यात स्फूर्ती दिन म्हणून साजरा केला जातो. अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यामध्ये सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार असून महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाच्यावतीने संगमनेर तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध गावांमध्ये वकृत्व स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा याचबरोबर अपंगांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. तर यशोधन कार्यालयात मूकबधीर विद्यालयाच्यावतीने 900 यूनिक कार्डचे तालुक्यातील दिव्यांगांना वाटप करण्यात येणार आहे. संपूर्ण तालुक्यात अत्यंत उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असून विविध कार्यक्रमांनी वाढदिवस साजरा होणार आहे.

Visits: 200 Today: 1 Total: 1916470

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *