सहकारी संस्था जपणे काळाची गरज ः देशमुख अंभोरे दूध संस्थेच्या अध्यक्षपदी देशमुख तर उपाध्यक्षपदी खेमनर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणार्‍या स्थानिक सहकारी संस्था या राजकारण विरहित असाव्यात. कारण शेतकरी, कष्टकरी, दुग्ध व्यावसायिक यांचे प्रपंच त्यावर अवलंबून असल्याने सहकारी संस्थेतील राजकारणाचा फटका सर्वसामान्य कुटुंबाला बसतो. संगमनेर तालुक्यातील सहकार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याला दिशादर्शक ठरला असून या सहकारी संस्था जपणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महानंद व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील नारायणगिरी महाराज सहकारी दूध संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विजयसिंह देशमुख, तुळशीराम मलगुंडे, किसन खेमनर, हौशीराम वाघमोडे, लक्ष्मण खेमनर, रावसाहेब खेमनर, किसन खेमनर, माधव बाचकर, लहानू खेमनर, बाळकृष्ण खेमनर, बाबुराव खेमनर, बबन खेमनर, अनिता खेमनर, कविता वाकचौरे, आनंदा बर्डे, भैय्या मणियार, दूध उत्पादक, सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिक सहकारी दूध संस्थांनी गुणवत्तेला अधिक महत्व देणे गरजेचे आहे. स्थानिक दूध संस्थांनी स्वच्छता, गुणवत्ता व पारदर्शक कारभार केला तर दूध उत्पादकांनाही फायदा होतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न घटले आहे. शेतकर्‍यांना दुग्ध व्यवसायाचाच आधार आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकारी दूध संस्था, सोसायटी, पतसंस्था या शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या सहकारी संस्थेत राजकारण न करता संस्थेच्या हिताच्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील सहकारात शिस्त, काटकसर व पारदर्शकपणाचे तत्वे घालून दिली आहेत. आजही त्यानुसार सर्व संस्थांचा कारभार चालतो. त्यामुळे दुष्काळप्रवण क्षेत्रात असलेला संगमनेर तालुका हा सहकारी संस्थांमुळे प्रगतिपथावर असल्याचे महानंद व राजहंसचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख म्हणाले. सदर निवडींचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, माधव कानवडे, लक्ष्मण कुटे, रणजीतसिंह देशमुख, दुर्गा तांबे, विजयसिंह देशमुख, सत्यजीत तांबे, इंद्रजीत थोरात, बाबासाहेब ओहोळ, शरयू देशमुख आदिंनी अभिनंदन केले.

Visits: 134 Today: 3 Total: 1583112

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *