खैरी निमगाव येथील अवैध दारु अड्डे उध्वस्त

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील खैरी निमगाव येथे गावठी हातभट्टी दारु अड्डे सुरू श्रीरामपूर भागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने रविवारी (ता.12) उध्वस्त केले.

खैरी निमगाव येथे गावठी हातभट्टी दारु अड्डे व हातभट्टी दारु तयार करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आपल्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना त्याठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार छापा टाकत कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारुचा जागेवरच नाश करण्यात आला. तर रमेश धोंडीराम गायकवाड (वय 35) याच्याकडून 42 हजार रुपयांचे 600 लिटर कच्चे रसायन व 1500 रुपयांची तयार दारु, अर्जुन केशव गायकवाड याच्याकडून 56 हजार रुपयांचे 800 लिटर कच्चे रसायन व 2 हजार 500 रुपयांची तयार दारु असा एकूण 1 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरील दोघा आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सलगच्या धडाकेबाज कारवाईने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सहा. उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे, मुख्य हवालदार सुरेश औटी, पोलीस कर्मचारी नितीन शिरसाठ, रवींद्र लगड, आरसीपी पथक आदिंचा सहभाग होता.

Visits: 172 Today: 1 Total: 1915933

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *