प्रत्येक गावच्या विकासासाठी सातत्याने मोठा निधी ः थोरात काकडवाडी गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायतची निर्मिती

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील नान्नज दुमाला गट ग्रामपंचायतमधून मौजे काकडवाडी ही आता स्वतंत्र झाली आहे. याकामी येथील तरुणांचा मोठा पाठपुरावा असून विकासकामांना आणखी गती मिळणार आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील विकासकामांकरीता आपण सातत्याने मोठा निधी दिला असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

काकडवाडी येथे मौजे काकडवाडी या फलकाचे अनावरण व नवीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ होते तर व्यासपीठावर एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, डॉ. हसमुख जैन, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, उपसभापती नवनाथ अरगडे, भारत मुंगसे, सुभाष सांगळे, निखील पापडेजा, गौरव डोंगरे, सरपंच संपत मुळे, उपसरपंच जनार्दन कासार, सोसायटीचे अध्यक्ष दिलीप शिरसाठ, उपाध्यक्ष सदाशिव गायकवाड, सुनील कासार आदिंसह गावचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

काकडवाडी हे आता स्वतंत्र मौजे गाव झाले आहे. यामुळे येथे नव्याने ग्रामपंचायत मिळाली आहे. या माध्यमातून ग्रामस्तरावराच्या विविध योजना राबविणे सोपे जाणार आहे. तळेगाव विभागाकरीता असलेल्या पाणी पुरवठा योजनेकरीता महेंद्र गोडगे यांच्या पाठपुराव्यातून 81 कोटी रुपये मिळाले आहे. यामुळे सोळा गावांना शाश्वत पाणी पुरवठा होणार आहे. तालुक्यातील विकासकामांचा वेग कायम आहे. प्रत्येक वाडी-वस्तीवर विकासासाठी मोठा निधी दिला जात आहे. या भागात नव्याने होणारा सूरत-हैद्राबाद मार्ग, निळवंडे कालवे, समृद्धी महामार्ग अशा विविध कामांमुळे हा भाग आगामी काळात अत्यंत विकसित झालेला असेल. काकडवाडी या गावाने आपल्यावर कायम प्रेम केले असून या गावाकरीता स्वतंत्र ग्रामपंचायत झाली हा अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचे नामदार थोरात म्हणाले. यावेळी अनिल कांदळकर, विशाल काळे, अशोक मुळे, रामनाथ शिरसाठ, संतोष काळे, चंद्रकांत गायकवाड, भाऊपाटील ढवळे, अनिता वाकचौरे, त्र्यंबक गायकवाड, कैलास गिरी, झुरळे महाराज, ऋतिक राऊत, रमेश नेहे यांसह गावातील कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व कोरोना संकटात चांगले काम केलेल्या नागरीकांचा नामदार थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सोसायटीचे अध्यक्ष दिलीप शिरसाठ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर सरपंच संपत मुळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *