अकलापूरमध्ये रेल्वे स्टेशन करण्याबाबत प्रांताधिकार्यांना निवेदन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे व नाशिक महानगरांना जोडणार्या सेमी हायस्पीड रेल्वेचे पठारभागातील अकलापूर (ता.संगमनेर) येथे स्टेशन व्हावे. या मागणीचे निवेदन नुकतेच ग्रामस्थांसह परिसरातील शेतकर्यांनी प्रांताधिकार्यांना दिले आहे.
प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग हा अकलापूर गावाजवळून जात आहे. त्यामुळे येथे रेल्वे स्टेशन झाले तर परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, व्यापार, रोजगार यासाठी मोठी मदत होईल. विशेष म्हणजे राज्यातील असंख्य दत्तभक्तांना दर्शनासाठी येण्यासाठी सोपे होईल. यातून गावचा विकास देखील साधला जाईल असे म्हटले आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकार्यांसह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बोटा गटाचे जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, रेल्वेचे अधिकारी गुंजाळ यांनाही दिले आहे. या निवेदनावर प्रताप तळेकर, वसंत आभाळे, अरुण वाघ, दतात्रय आभाळे, संपत आभाळे, नामदेव गायकवाड, एकनाथ वाणी, चागंदेव आहेर, अशोक थोरात, राजेंद्र राऊत, सुरेश आहेर, एकनाथ आहेर, सुदाम साबळे, किसन आहेर, जयदास गायकवाड, बाबाजी आभाळे आदिंच्या सह्या आहेत.