गायकर प्रतिष्ठानकडून ब्राम्हणवाडा कोविड सेंटरला मदत


नायक वृत्तसेवा, अकोले
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सीताराम गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या सहकारमहर्षी सीताराम गायकर प्रतिष्ठानच्यावतीने ‘एक हात मदतीचा गोरगरीब नागरिकांच्या आधाराचा’या संकल्पनेतून नुकतीच ब्राम्हणवाडा येथील कोविड केअर सेंटरला 51 हजार रुपयांची औषधे, वैद्यकीय साहित्य, 300 सॅनिटायझर पेन, 30 सॅनिटायझर ड्रम, 30 पाण्याचे बॉक्स आदी भरीव मदत करण्यात आली आहे.

मुळा विभागाचे युवा सामाजिक कार्यकर्ते व साई एंटरप्राईजेस उद्योग समूहाचे संचालक नीलेश गायकर, बेलापूरचे माजी सरपंच चंद्रकांत महाले यांचे विशेष सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे. याचबरोबरच कोतूळ कोविड सेंटर, धुमाळवाडी कोविड सेंटर, अगस्ति कोविड सेंटर व सुगाव येथील कोविड सेंटर यांनाही सुमारे 150 सॅनिटायझर पेन आणि 150 सॅनिटायझर ड्रमचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नीलेश गायकर आणि मित्रपरिवाराने मुंबईकर, पुणेकर मंडळींना जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी ब्राम्हणवाडा गावचे माजी सरपंच देवराम गायकर, भारत आरोटे, पोपट हांडे, सुभाष गायकर, रवींद्र हांडे, विकास महाले, डॉ.भारत ताले, नितीन डुंबरे, अक्षय आरोटे, शंकर हांडे, प्रकाश शिंदे, संजय गायकर, सतीश फापाळे, लहू तिकोणे, राहुल लांडे, भगवान काळे, मंगेश फापाळे, नीलेश फापाळे, भाविक खरात, डॉ. सोनवणे, अतुल फापाळे, बाबू महाले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Visits: 143 Today: 1 Total: 1589049

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *