उत्सुकता ताणलेल्या सरपंचपदाचे आरक्षण 27 जानेवारीला संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण होणार जाहीर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गावचा गाडा हाकण्यासाठी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल 18 जानेवारीला घोषित झाला आहे. तत्पूर्वी सरपंच पदाचे आरक्षण निकालानंतर जाहीर करण्यात येणार असल्याने विजयी सदस्यांच्या नजरा सरपंच आरक्षण सोडतीकडे खिळलेल्या असतानाच संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यासाठी 27 जानेवारी रोजी विशेष सभेचे शहरातील प्रांत कार्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी दिली आहे.


तालुक्यातील 143 ग्रामंपचायतींसाठी अनुसूचित जातीसाठी एकूण 13 जागा असून (खुला 7, महिला 6), अनुसूचित जमातीसाठी एकूण जागा 17 (खुला 8, महिला 9), नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण जागा 39 (खुला 19, महिला 20), खुला प्रवर्गासाठी एकूण जागा 74 (खुला 37, महिला 37) नुसार आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. सदर आरक्षण सोडत ग्रामविकास विभागाकडून प्राप्त झालेल्या आरक्षणानुसार बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींची संख्या आणि अनुसूचित जाती-जमाती लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार व नागरिकांच्या मागास प्रवर्गानुसार वाटप केलेले असल्याचे प्रांताधिकारी डॉ.मंगरुळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

Visits: 239 Today: 1 Total: 1790846

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *