राज्यात आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन 

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
शासनाच्या महसूल विभागामार्फत राज्यभरात ‘महसूल सप्ताह – २०२५’  शुक्रवार दि.१ ऑगस्ट ते गुरुवार दि.७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या योजनांची माहिती, लाभ व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी शासनाने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली.
या संपूर्ण आठवड्यात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी व सर्व महसूल कर्मचारी नागरिकांपर्यंत महसूल सेवा पोहोचवण्यासाठी सज्ज राहतील. प्रत्येक जिल्ह्यात हेल्पडेस्क व व्हॉट्स ॲप सेवा सुरू करण्यात येणार असून, नागरिकांच्या शंका व अडचणींचे निरसन तत्परतेने करण्यात येईल.
शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे व्हिडिओ, प्रसिद्धिपत्रके तयार करून वृत्तपत्रे, सोशल मिडिया व स्थानिक माध्यमांतून व्यापक प्रसिद्धी दिली जाणार आहे.‘महसूल सप्ताह – २०२५’ हा उपक्रम महसूल खात्याच्या पारदर्शक, सक्षम व लोकाभिमुख कार्यपद्धतीचा भाग असून, शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न या उपक्रमातून प्रत्यक्षात उतरणार आहे.
Visits: 220 Today: 1 Total: 1600426

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *