खासगी डॉक्टर साईबाबा कोविड केंद्रात सेवा देणार
खासगी डॉक्टर साईबाबा कोविड केंद्रात सेवा देणार
नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईनगरीतील साईबाबा कोविड उपचार केंद्रात जवळपास पंधरा खासगी डॉक्टरांनी सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. अजूनही अनेक जण इच्छुक असल्याचे राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.
तहसीलदार हिरे यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के, डॉ.गोकुळ घोगरे, डॉ.स्वाती म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (ता.21) तालुक्यातील डॉक्टरांची या संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वच डॉक्टरांनी साईदरबारी आनंदाने रुग्णसेवा करण्याची तयारी दर्शवली. यावेळी डॉ.शुभांगी कान्हे, डॉ.शिला पठारे, डॉ.दत्ता कानडे, डॉ.डी.एस.खंडीझोड, डॉ.बी.डी.महामिने, डॉ.डी.बी.महामिने, डॉ.मृणाल खर्डे, डॉ.अमोल पोकळे, डॉ.किरण गोरे, डॉ.संतोष मैड, डॉ.यू.आर.शिंदे, डॉ.मिलिंद नाईक, डॉ.विजय म्हस्के, डॉ.वैभव मालकर, डॉ.अतुल गुळवे आदिंची उपस्थिती होती. सामाजिक जाणिवेबरोबरच साईबाबांचा रुग्णसेवेचा वसा जपण्यासाठी हे डॉक्टर्स साईबाबा कोविड उपचार केंद्रात सेवा देणार आहेत. या डॉक्टरांना आठवड्यातून एक दिवस आठ तास सेवा द्यावी लागणार आहे. सध्या कोविड रुग्णांचे प्रमाण कमी झाले असून कदाचित महिन्यातून प्रत्येकाला एक किंवा दोन दिवस येथे सेवा द्यावी लागणार आहे.