शेवगाव भूमी अभिलेख कार्यालय घाणीच्या विळख्यात

शेवगाव भूमी अभिलेख कार्यालय घाणीच्या विळख्यात
नायक वृत्तसेवा, शेवगाव
शहराच्या जुनी प्रेस भागात खडकाळ जमिनीवर असलेल्या तालुका भूमी अभिलेख कार्यालय सध्या घाणीच्या विळख्यात सापडले आहे. या कार्यालयात असंख्य सामान्य नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे ऐन कोरोना महामारीच्या संकटात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


शेवगाव शहरातील भूमी अभिलेख कार्यालयात सामान्य नागरिक शेती, बिनशेती, खासगी जागा, व्यापारी जागा, विविध नोंदी, चतुःसीमा, गटमोजणी, बांधकाम परवानगी आणि उतारे आदी कामे घेऊन येतात. परंतु व्यवस्थापनाचे स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे ऐन कोरोना संकटात कामानिमित्त येणार्‍या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर येथील अधिकारी व कर्मचार्‍यांवरही याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यालय व्यवस्थापनाने तत्काळ याची दखल घेऊन परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांतून होत आहे.

Visits: 18 Today: 1 Total: 117933

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *