संगमनेर शहर शिवसेनाप्रमुखपदी आप्पा केसेकर यांची नियुक्ती! उत्तरेतील पदाधिकार्‍यांचे खांदापालट; खेवरे पुन्हा शिर्डी लोकसभेचे जिल्हाप्रमुख..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील निवडणूक निकालांचे पडसाद विविध पक्षांमध्ये उमटू लागले असून पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर विखूरलेल्या शिवसेनेनेही (ठाकरे गट) जिल्ह्यात पक्षातंर्गत पदाधिकार्‍यांचे खांदेपालट केले असून शिर्डी लोकसभेच्या जिल्हाप्रमुखपदी पुन्हा एकदा रावसाहेब खेवरे यांची वर्णी लागली आहे. तर, ज्येष्ठ शिवसैनिक कैलास उर्फ आप्पा केसेकर यांची संगमनेर शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. दैनिक सामनातून पदाधिकार्‍यांच्या नावाची घोषणा करतांना पक्षाने संगमनेरसह अकोले, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी व नेवासा या उत्तरेतील सर्व तालुक्यात खांदेपालट घडवून आणले आहे.


दैनिक सामनामधून प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, प्रचारप्रमुख सुहास वहाडणे (संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता), राजेंद्र पठारे (श्रीगोंदा, नेवासा, राहुरी), सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा), अ‍ॅड.दिलीप साळगट (संगमनेर, अकोले, राहाता), जिल्हा समन्वयक नितीन औताडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा), मुजीब शेख (संगमनेर, अकोले, राहाता), जिल्हा संघटक नाना बावके (संगमनेर, अकोले, राहाता), प्रमोद लबडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा) आदींची निवड करण्यात आली आहे.


यासोबतच संगमनेर शिवसेनेतही मोठे फेरबदल करण्यात आले असून पूर्वीच्या सर्व पदाधिकार्‍यांना नारळ देत उपजिल्हा प्रमुखपदी अशोक सातपुते, शहरप्रमुखपदी कैलास उर्फ आप्पा केसेकर, तालुकाप्रमुख (पठारभाग) संजय फड, विधानसभा संघटक (पठार) गुलाबराजे भोसले, कैलास वाकचौरे, शहर संघटक रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे, शहर समन्वयक प्रसाद पवार यांची वर्णी लागली आहे. शिवसेनेने (ठाकरे गट) जाहीर केलेल्या या निवडीतून पक्षाने जुन्या पदाधिकार्‍यांवर भरवसा ठेवल्याचेही दिसून येत असून त्यातून शिर्डी लोकसभेची जागा राखण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

Visits: 38 Today: 1 Total: 118154

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *