बेलापूरमध्ये प्रभू श्रीरामांबद्दलचा अवमानकारक व्हिडीओ व्हायरल श्रीरामपूर तालुका पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल करुन केली अटक


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
सकल हिंदू धर्माचे श्रद्धास्थान प्रभू श्रीरामांबद्दल इंस्टाग्रामवर अवमानकारक व्हिडीओ टाकून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या. त्याचबरोबर औरंगजेबाचे समर्थन करणारा एक व्हिडिओही पाठवून भावना दुखावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बेलापूर (ता.श्रीरामपूर) येथील एका तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीविरोधात गुन्हा दाखल झालेला असून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून शिक्षा व्हावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शनिवारी (ता.१९) बेलापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथील कृष्णा राजेंद्र ढेपे हा विद्यार्थी श्रीरामपूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतो. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर. १६ ऑगस्ट रोजी रात्री एका इंस्टाग्राम अकाउंटवरून हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामांबद्दल वाईट शब्द वापरून अवामानकारक व्हिडिओ पाठविण्यात आला. हा व्हिडिओ सदर विद्यार्थ्याने पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना दाखवला. त्यानंतर पोलिसांनी सदर व्हिडीओ कुणाच्या आयडीवरून आला याचा तपास घेतला असता सदर व्हिडिओ हा बेलापूर येथील आदिल रसूल शेख याच्या आयडी नंबरवरून आल्याचे समजले.

त्याचबरोबर १३ ऑगस्ट रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास कृष्णा ढेपे याचा मित्र समाधान पुरी याच्याही इस्टाग्रामवर औरंगजेबचा फोटो टाकून आक्षेपार्ह व्हिडीओ टाकण्यात आला. या दोन्ही व्हिडीओंमध्ये हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेकांनी पाहिले आहेत. प्रभू श्रीरामांबद्दल अवामानकारक व्हिडीओ पोस्ट करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे कृत्य करून शत्रूत्वाची, द्वेषाची भावना निर्माण केली. याप्रकरणी कृष्णा ढेपे या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आदिल रसूल शेख (रा. बेलापूर) याच्या विरोधात भादंवि कलम २९५ अ, ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अशाप्रकारचे व्हिडीओ पोस्ट करुन दोन धर्मात द्वेष निर्माण करण्याच्या आजपर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. पोलीस प्रशासनाने अशा तरुणांविरोधात कडक कारवाई करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *