शहराच्या तुलनेत ग्रामीणभागात चौपट गतीने वाढतायेत रुग्ण! आजही शहरातील अवघ्या तिघांसह सहव्वीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील ग्रामीणभागात कोविडचा प्रादुर्भाव गतीने वाढत आहे. दररोज येणार्‍या रुग्णसंख्येत शहरातील नगण्य रुग्णांसह ग्रामीणभागातील रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे. आजही खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजही शहरातील रुग्णसंख्येत अवघ्या 3 रुग्णांची तर ग्रामीणभागातील रुग्णसंख्येत तब्बल 23 जणांची नव्याने भर पडली आहे. आजच्या रुग्णसंख्येने तालुक्यातील बाधितांची संख्या 2 हजार 588 वर पोहोचली आहे.

आजच्या अहवालातून संगमनेर शहरातील जनतानगर परिसरात राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेसह मालदाड रोड परिसरातील तेवीस वर्षीय महिला व चार वर्षीय बालिकेला कोविडचे संक्रमण झाले आहे. तर तालुक्यातील जोर्वे येथील 40 वर्षीय तरुण, वेल्हाळे येथील 36 वर्षीय तरुणासह 34 व तीस वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 55 वर्षीय इसम, निमगाव बुद्रुक येथील 64 वर्षीय तर सुकेवाडी येथील एकूण 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक,

पोखरी हवेली येथील 62 वर्षीय महिला, ओझर खुर्द मधील 55 व 50 वर्षीय महिलांसह आठ वर्षीय बालिका, निमोण येथील वीस वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 50 वर्षीय इसमासह 27 वर्षीय तरुण, पळसखेड येथील 31 वर्षीय तरुण, मालदाड येथील 50 वर्षीय महिला, कौठे बुद्रुक येथील 46 वर्षीय तरुण, चंदनापुरी येथील 66 वर्षीय इसम, सावरगाव तळ मधील 65 वर्षीय दोन महिलांसह 37 वर्षीय तरुण व 13 वर्षीय बालिका संक्रमित झाल्याचे समोर आले आहे.आजच्या रुग्णसंख्येतूनही शहरातील केवळ तीन जणांना तर ग्रामीण भागातील 23 जणांना कोविडचीची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तालुक्याच्या रुग्णसंख्येत आज 26 जणांची भर पडल्याने रुग्णसंख्या 2 हजार 588 वर जाऊन पोहोचली आहे.

गेल्या 1 सप्टेंबरपासूनचा विचार करता तालुक्यातील रुग्णसंख्येत गतीने वाढ होत आहे. मात्र या वाढीत शहरातील रुग्णसंख्या अगदीच नगण्य असल्याने आश्‍चर्य आणि समाधानही व्यक्त होत आहे. या महिन्याच्या अगदी प्रारंभापासूनच एकुण रुग्णसंख्येतील शहराचा वाटा कमीकमी होत गेला आहे, त्यामुळे गेल्या 18 दिवसांचा विचार करता शहरातील रुग्णसंख्येत अवघ्या 159 रुग्णांची तर त्या तुलनेत चौपट संख्येने ग्रामीणभागातील रुग्णसंख्या तब्बल 704 ने वाढली आहे.

गेल्या 18 दिवसांत शहरातील माळीवाडा येथील 70 वर्षीय इसम व पंपींग स्टेशन येथील 73 वर्षीय महिला अशा दोघांचे तर तालुक्यातील समनापूर येथील 62 वर्षीय इसम, मालदाड येथील 35 वर्षीय तरुण, चंदनापूरीतील 39 वर्षीय तरुण, गिरीराज नगरमधील 59 वर्षीय इसम (अन्य तालुका), घुलेवाडीतील 80 वर्षीय इसम, चिखलीतील 76 वर्षीय महिला, हिवरगाव पठार येथील 55 वर्षीय इसम, वेल्हाळे येथील 65 वर्षीय इसम, मंगळापूर येथील 65 वर्षीय इसम व कौठे धांदरफळमधील 55 वर्षीय इसमाचा बळीही गेला आहे.

संगमनेर तालुक्यात कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आजवर शहरासह 130 गावांमध्ये संक्रमण पसरले आहे. शहरी भागातील 845 जणांना आत्तापर्यंत कोविडची बाधा झाली असून त्यातील 791 जणांनी उपचार पूर्ण करुन घर गाठले आहे, 45 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत तर तेरा जणांचा बळीही गेला आहे. तालुक्याच्या ग्रामीणभागात आजवर 1 हजार 743 रुग्ण समोर आले, त्यातील 1 हजार 482 रुग्णांनी उपचार पूर्ण केले, 241 जणांवर उपचार सुरु असून 25 जणांनी आत्तापर्यंत आपला जीव गमावला आहे.

स्थानिक आरोग्य यंत्रणेने आजवर संगमनेर तालुक्यातील 8 हजार 973 जणांची स्त्राव चाचणी केली आहे. त्यात शासकीय प्रयोगशाळेद्वारा 3 हजार 455, खासगी प्रयोगशाळेद्वारा 1 हजार 552 तर रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा सर्वाधीक 3 हजार 966 जणांची तपासणी झाली आहे. तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण समोर येण्याचे प्रमाण सरासरी 28.55 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.72 टक्के तर मृत्युचा दर 1.25 टक्क्यांवर पोहोचला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल १ हजार ५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३० हजार १३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.१० टक्के इतके झाले आहे. जिल्ह्यात आज ६९७ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ७०७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १३४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २१० आणि अँटीजेन चाचणीत ३५३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये महापालिका क्षेत्रातील ६८, राहाता ०१, पाथर्डी ०३, श्रीरामपूर ०९, नेवासा ०४, श्रीगोंदा ०५, पारनेर ०४, अकोले ०७, राहुरी १७, कोपरगाव ०१, कर्जत ०१ आणि लष्करी रुग्णालयातील ११ रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत जिल्ह्यात २१० रुग्ण आढळून आले.  यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्र ५७, संगमनेर ०८, राहाता ३७, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण १६, श्रीरामपुर १०, लष्करी परिसर ०३, नेवासा ०९, श्रीगोंदा ०६, पारनेर १३, अकोले ०३, राहुरी ३५, शेवगाव ०५, कोपरगाव ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज अँटीजेन चाचणीतून ३५३ रुग्ण समोर आले.  यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्र १९, संगमनेर १८, राहाता ३७, पाथर्डी २७, नगर ग्रामीण ०६, श्रीरामपूर २०, लष्करी परिसर ०४, नेवासा ५५, श्रीगोंदा १९, पारनेर १२, अकोले ४५, राहुरी ०२, शेवगाव ३२, कोपरगाव २९, जामखेड १८ आणि कर्जत १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

आज जिल्ह्यातील विक्रमी रुग्णांना मिळाला डिस्चार्ज..!

अहमदनगर महापालिका क्षेत्र २३५, संगमनेर ६६, राहाता १४२, पाथर्डी २९, नगर ग्रामीण ५५, श्रीरामपूर ७६, लष्करी परिसर ११, नेवासा ६७, श्रीगोंदा ३२, पारनेर ६२, अकोले ४७, राहुरी ८१, शेवगाव ३६, कोपरगाव ३७, जामखेड ३०, कर्जत ३७, लष्करी रुग्णालय ०८ येथील रुग्णांनी उपचार पूर्ण करीत कोविडचा पराभव केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

  • जिल्ह्यात बरे झालेली रुग्ण संख्या : ३० हजार १३६..
  • जिल्ह्यात उपचार सुरू असलेले रूग्ण : ४ हजार ७०७..
  • जिल्ह्यातील एकूण मृत्यू : ५६९..
  • जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या : ३५ हजार ४१२..
  • जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.१० टक्के..
  • जिल्ह्यात आज ६९७ बाधितांची रुग्णसंख्येत भर..

Visits: 19 Today: 1 Total: 115956

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *